help of three wheeler cycle to disabled student through Social Welfare Department jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : दिव्यांग गुरुला तीनचाकी सायकल; शाळेत येण्याजाण्यासाठी मदत!

रोहिदास मोरे

Jalgaon News : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मन्यावस्ती (ता. चोपडा) या अवघ्या तीनशे लोकसंख्येच्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या गुरु बारेला या दिव्यांग विद्यार्थ्याला खर्डी येथील आरोग्य दूतांच्या सहकार्याने समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून तीन चाकी सायकलीची मदत झाली आहे. (help of three wheeler cycle to disabled student through Social Welfare Department jalgaon news)

या सायकलीमुळे गुरुला सुमारे तीन किलोमीटरवर शाळेत ये- जा करणे आता सोयीचे होणार आहे. खर्डी (ता. चोपडा) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मन्यावस्तीतील गुरु खुमासिंग बारेला हा बारा वर्षांचा दिव्यांग विद्यार्थी खर्डीतील शाळेत सातवीत शिक्षण घेतो. त्याचे गाव आणि शाळा यात सुमारे तीन किलोमीटरचे अंतर आहे.

दिव्यांग असल्यामुळे गुरुला शाळेत येण्याजाण्यासाठी खूपच गैरसोय होत होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याची शिकण्याची जिद्द पाहून त्याला खर्डी येथील शारदा विद्या मंदिरात कसाबसा चालत येताना त्याला पाहून अनेकांना त्याच्याविषयी करुणा वाटायची.

या विद्यार्थ्याची माहिती खर्डीचे आरोग्यदूत कमलाकर पाटील व मंगल पाटील यांना समजवली. त्यांनी त्याच्याबद्दलची सर्व माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग यांना दिली. त्यांनी लागलीच भरत चौधरी यांना खर्डी गावात पाठविले आणि तीन चाकी सायकल गुरुला भेट दिली. या सायकलीमुळे आता गुरुला शाळेत ये- जा करणे सोयीचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT