Officer-in-Charge Police Officer Bharat Choudhary, Sub-Inspector of Police Parashuram Dalvi along with office-bearers and members present at the Peace Committee meeting esakal
जळगाव

Jalgaon News : वरणगावात हॉटेल, दुकाने रात्री दहानंतर बंद! शांतता समितीच्या बैठकीत पोलिस प्रशासनाचा निर्णय

येथे आधीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी खाद्यपदार्थ, मद्यविक्री करणाऱ्या आस्थापनांसह हॉटेल रात्री दहानंतर ‘बंद’चा निर्णय लागू केला होता.

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव, (ता. भुसावळ) : येथे आधीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी खाद्यपदार्थ, मद्यविक्री करणाऱ्या आस्थापनांसह हॉटेल रात्री दहानंतर ‘बंद’चा निर्णय लागू केला होता.

मात्र त्यांच्या बदलीनंतर हा निर्णय लुप्त झाला होता. आता नवीन पोलिस अधिकारी भरत चौधरी यांनी पुन्हा कायदा सुव्यवस्था राखली जावी, या दृष्टीने शांतता समितीची बैठक घेऊन पुन्हा रात्री दहानंतर आस्थापना बंदचा निर्णय घेतला आहे.

तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास सरळ कासवाईचा झ्शारा दिला आहे. (Hotels shops close after 10 pm in Varangaon Decision of police administration in peace committee meeting Jalgaon News)

आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी पाहता वरणगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वरणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी भरत चौधरी व पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. २९) शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती.

बैठकीत रात्री दहानंतर शहरातील संपूर्ण आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांकडून रात्री दहानंतर मेडिकल व आरोग्य सेवेतील आस्थापना वगळता सर्व बंद केल्या जाणार आहेत.

पोलिस ठाणे अंतर्गत नेमलेले कर्मचारी रात्री दहानंतर सुरू असलेल्या आस्थापना व दुकानदारांवर कारवाई करणार आहेत.

शहरात रात्री दहानंतर एकही दुकान, हॉटेल अथवा इतर आस्थापना उघडे ठेवू नयेत, असे आवाहन वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांनी केले आहे. रात्री दहानंतर पोलिसांकडून गस्त सुरू करून दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे.

दंड अथवा थेट फौजदारी कारवाई

गेल्या दोन दिवसांपासून शहरात किरकोळ वादामधून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रात्री दहानंतर शहर आणि परिसरातील हॉटेल, दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या सूचनेचे पालन केले नाही, तर दंड अथवा थेट फौजदारी कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, या निर्णयाचे काही लोकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी विरोध केला आहे.

बैठकीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे, अलाउद्दीन शेठ, मका सेठ, राजेंद्र चौधरी, विलास मुळे, शेख सईद शेख भिकारी, महेश सोनवणे, अशपाक काजी, संतोष माळी, अखलाक शेख आदींनी बैठकीत विविध विषयांसंदर्भात आपले म्हणणे मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT