fire  esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident : अचानक लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य खाक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील विद्यानगरमधील उद्योजक अशोक जाजू यांच्या निवासस्थानाच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी (ता. २३) सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. त्याचवेळी नळांना पाणी आल्यामुळे अशोक जाजू यांचे भाऊ मनोज जाजू वरच्या मजल्यावर गेले. (Household materials were destroyed in fire accident jalgaon news)

त्यांना कुलरच्या बाजुला असलेल्या सोफ्याला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. घरातून धूर निघत असल्याने रस्त्यावरून जात असलेल्या मनोज मोहिते यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला आगीबाबत माहिती दिली. वरच्या मजल्यावर अडकलेल्या मनोज जाजू यांना उतरविण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे चार बंब लागले. आगीत सोफा, कुलर, एसीसह इतर साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले.

अग्निशमन दलाचे सुनील मोरे, युसूफ पटेल, प्रदीप धनगर, नंदकिशोर खडके, निवांत इंगळे, भारत छापरिया, पन्नालाल सोनवणे, रवींद्र बोरसे, मोहन भाकरे, राजेंद्र रानवडे, नीलेश सुर्वे यांनी आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT