Mobile repairing esakal
जळगाव

जळगाव : मोबाईल दुरुस्तीने दिले शेकडो हातांना काम

आनन शिंपी

चाळीसगाव (जि. जळगाव) : गेल्या पाच वर्षांत मोबाईलचे (Mobile) मोठे मार्केट बनलेल्या चाळीसगाव शहरात मोबाईल दुरुस्तीच्या (Mobile Repairing) व्यवसायातून विशेषतः अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. मोबाईलची दुरुस्ती करणाऱ्या शहरासह ग्रामीण भागातील सुमारे दीडशेच्यावर तरुणांपैकी काहींनी स्वतःची दुकाने थाटली असून इतर दुसऱ्यांच्या दुकानात कारागीर म्हणून काम करीत आहेत. दरम्यान, मोबाईलची दुरुस्ती करणाऱ्या कारागीरांपैकी बहुतांश कारागीरांनी मोबाईलच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतलेले असल्याने त्यांची कुशल कामगार (Skilled Worker) म्हणून नोंदणी करुन शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा या कारागीरांमधून व्यक्त होत आहे. (Hundreds of people worked in mobile repair in Chalisgaon Jalgaon News)

शहरात गेल्या दहा वर्षांत झालेल्या विविध कॉम्प्लेक्समध्ये मोबाईलच्या विक्री व दुरुस्तीची दुकाने थाटली आहेत. गणेश रोडवरील गणेश कॉम्प्लेक्स तर मोबाईलचेच मार्केट म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शहरात मोबाईलची जवळपास ८० च्यावर दुकाने असून या दुकानांमध्ये मोबाईलची दुरुस्ती करणारे सुमारे दीडशेच्यावर कारागीर आहेत. मोबाईलचा वापर आता प्रत्येक जण करीत असल्याने व मोबाईल ही गरजेची वस्तू झाल्याने दरवर्षी मोबाईलची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. एकीकडे मोबाईलच्या किमती वाढत असल्या तरी त्यांची विक्री मात्र कमी झालेली दिसून येत नसल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. सद्यःस्थितीत बाजारात पाचशे रूपयांपासून तर लाखो रुपये किंमतीचे मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मोबाईल ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्याने त्याच्या दुरुस्तीची दुकानेही तेवढीच वाढली आहेत.

दुरुस्ती कामामुळे रोजगार

मोबाईल विक्रीच्या दुकानांप्रमाणे त्यांच्या दुरुस्तीची दुकाने देखील तितकीच वाढली आहेत. दर महिन्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे मोबाईल बाजारात येत असले तरी त्यांच्या दुरुस्तीच्या दृष्टीने तसे तंत्र देखील विकसित होताना दिसते. मोबाईल दुरुस्ती शिकवणाऱ्या संस्था देखील आता नावारुपाला आल्या आहेत. दुरुस्तीचे प्रशिक्षण कमी खर्चामध्ये उपलब्ध होत असल्याने व यातून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे बहुतांश तरुण याकडे वळताना दिसत आहेत. सद्यःस्थितीत मोबाईल दुरुस्तीच्या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री कोर्स उपलब्ध नाही. मात्र, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करुन मोबाईलचे प्रशिक्षण घेता येते. पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये असा कोर्स केल्यानंतर कंपन्यांच्या सर्विस सेंटरवर तंत्रज्ञ म्हणून नोकरी सहज उपलब्ध होते. शिवाय स्वतःचा व्यवसाय देखील करता येत असल्याने बहुतांश बेरोजगार तरुण सध्या मोबाईल दुरुस्तीच्या क्षेत्रात उतरले आहेत. या कामामुळे अनेकांना चांगला रोजगार प्राप्त होत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाल्याचे दिसत आहेत.

शासकीय लाभापासून वंचित

शहरातील मोबाईल दुकानांमध्ये काम करणाऱ्या कारागीरांची कुठलीही अधिकृत नोंदणी झालेली नाही. त्यामुळे हे सर्व कारागीर शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत. केवळ जेवढे काम करतात, त्यापोटी मिळणाऱ्या मजुरीवरच त्यांची गुजराण होते. त्यामुळे राज्य कामगार विमा योजना अधिनियम १९४८ च्या कलम १(५) नुसार २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकानांमधील कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो, तसा लाभ मोबाईलच्या दुकानांमध्ये दुरुस्तीचे काम करणाऱ्या कारागीरांनाही मिळावा, अशी अपेक्षा मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या केशव पाटील या कुशल कारागीराने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

"मी सुरूवातीला टेलिकॉमध्ये कामाला होतो. क्वाईन बॉक्स व टेलीफोन दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र, मोबाईलचा वापर झपाट्याने वाढल्याने पुणे येथे मोबाईल रिपेअरिंगचे प्रशिक्षण घेतले. बाजारात नवनवीन मोबाईल येत असले तरी त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात फार काही नवीन नसते. त्यामुळे मोबाईल सहज रिपेअर करता येतो. यातून सध्या पाचशे ते सहाशे रुपये दिवसाला मिळतात." - निळकंठ साळुंखे, मोबाईल दुरुस्ती कारागीर, चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT