Jalgaon Ideal Teacher Award : जळगाव जिल्हा परिषदेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची सोमवारी (ता. ४) घोषणा करण्यात आली.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १५ शिक्षकांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. शिक्षक दिनी अर्थात् मंगळवारी (ता. ५) पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. (ideal Teacher Award announced to 15 people from Jalgaon district news)
जिल्हा परिषदेच्या पुरस्कारासाठी जिल्ह्याभरातून यंदा २३ शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांची छाननी करुन पात्र शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी पात्र १५ शिक्षकांची यादी जिल्हा परिषद सीईओ तथा प्रशासक श्री. अंकित व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी नाशिक विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविली होती. त्यास मान्यता मिळाल्याने प्रत्येक तालुक्यातून १ शिक्षकांस पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान निवड समितीने १५ शिक्षकांची नावं जाहीर केली आहेत. यावर्षी देण्यात येत असलेल्या १५ पुरस्कारांमध्ये ४ महिला शिक्षकांचा समावेश आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा जळगावातील ला. ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात सकाळी अकराला होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.
पुरस्कारप्राप्त शिक्षक
गजानन रमण चौधरी (ढेकुसीम, ता. अमळनेर), गणेश व्यंकटराव पाटील (अंचळगाव, ता. भडगाव), महेंद्रसिंग शिवशिंग पाटील (नांदगाव, ता. भडगाव), रिजवानखान अजमलखां (उर्दू शाळा कुऱ्हे, भुसावळ), किशोर बाळाराम पाटील (देवगाव, ता. चोपडा), शुभांगी एकनाथराव सोनवणे (न्हावे, ता. चाळीसगाव), विजय काशिनाथ बागुल (वराड, ता. धरणगाव), गणेश सुखदेव महाजन (टाकरखेडा, ता. एरंडोल), ज्योती सतीश तडाखे (नांद्रे, ता. जळगाव), कैलास समाधान पाटील (सोनारी, ता. जामनेर), धनलाल वसंत भोई (केंद्राचे शाळा ना. १ मुक्ताईनगर), विजया भालचंद्र पाटील (बाळंद, ता. पाचोरा), अलका बाबुलाल चौधरी (बोळे, ता. पारोळा), जितेंद्र रमेश गवळी (पुनखेडा, ता. रावेर), अतुल रमेश चौधरी (सांगवी, ता. यावल).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.