तरवाडे (ता. चाळीसगाव) : रहिपुरी येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रभर ट्रॅक्टर तर दिवसभर बैलगाड्यांच्या साह्याने वाळूची वाहतूक सुरू असून, याकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने त्याचा त्रास तरवाडे येथील रहिवाशांना होत आहे.
वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या रात्रभर आवाजामुळे ग्रामस्थ व तांडा वस्ती अक्षरशः वैतागली आहे. दररोज रात्रभर ट्रॅक्टर व त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या दुचाकी रात्रभर झोपू देत नाही. वाळूमाफिया म्हणतात, आमचे कोणी काहीही करू शकत नाही. (Ilegal Sand transport in girna river ignorance of revenue department people disturbed jalgaon news)
आमच्या मागे मोठमोठे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे यांची दहशत वाढत चालली आहे. त्यातच काल रात्री तरवाडे गावाजवळ वडगावकडून येणारा व बोरखेडा, रहिपुरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या उमेश महाडिक या शेतकऱ्यांच्या विहिरीवरील शेतीपंपाची चोरी झाली. यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांचे पंप चोरीस गेले आहेत.
शेतकरी म्हणतात, वाळूच्या ट्रॅक्टरनिमित्ताने रात्रभर दुचाकी फिरत असल्यामुळे रात्रीचा गैरफायदा घेत शासनाच्या गौण खनिजासोबत शेतकऱ्यांच्या वीजमोटारी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. त्यासाठी पोलिस प्रशासन व महसुली विभागाने यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा तरवाडेवासीयांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.