मुक्ताईनगर (जि. जळगाव) : पूर्वी होळी (holi), धूलिवंदन खेळायला पळसाच्या फुलांपासून बनवलेला रंग वापरला जायचा. (Importance of leaves with palash flowers on holi festival telled by District Bank Director jalgaon news)
कालानुरूप त्यात बदल होऊन त्याची जागा आता कृत्रिम, रासायनिक रंगांनी घेतलीय. मानवाने नैसर्गिक गोष्टींचा त्याग केला असला, तरी पळसाने आपल्या सवयीप्रमाणे वसंत ऋतूत बहरणे अद्याप त्यागलेले नाही.
पळसाच्या फुलांसह पानांचे महत्त्व यंदाच्या होळीनिमित्त पटवून दिलंय जिल्हा बँकेच्या संचालिका ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ जारी करत त्याबद्दलची माहिती दिली.
वनक्षेत्रातील पळस
मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावर वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पळसाची झाडे आहेत. ही पळसाची झाडे गर्द नारिंगी रंगांच्या फुलांनी बहरली असून, ये-जा करणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे मुक्ताईनगरवरून बोदवडला जात असताना त्यांनी वाटेत थांबून पळसाची फुले तोडून घेतली. त्याचबरोबर त्यांनी पळसाच्या झाडाजवळ थांबून एक व्हिडिओ बनविला.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
त्यात त्यांनी पळसाच्या झाडांच्या फुले, पान, बिया यांचे आयुर्वेदिक महत्त्व व उपयोग, तसेच इतिहासात पळस गावाजवळ झालेल्या प्लासीच्या लढाईचा उल्लेख, याबाबतची माहितीही शेअर केली. हा व्हिडिओ त्यांनी फेसबुक व इतर सोशल मीडियावर टाकला असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
मेघांच्या पळसात...
‘मेघांच्या पळसाचा अस्तावर जाळ, अस्तांच्या कंठात माणकांची माळ..!’ नेमके काहीसे असेच दृश्य सध्या मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावर दिसत आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बहरलेला पळस जणूकाही फ्लेम ऑफ फॉरेस्ट दिसत आहे, असे वर्णन रोहिणी यांनी केले आहे.
असे आहे पळसाचे महत्त्व
पळसाचे झाड मध्यम आकाराचे आणि १२ ते १५ मीटर उंचीचे असते. पळसाला काळ्या रंगाच्या कळ्या येतात आणि नंतर कळ्यांची फुले होतात. दरम्यानच्या काळात पाने झडतात. पळसाला पिवळी आणि पांढरी फुलेही आढळतात. या सुंदर रंगांना गंधही नाही. पळस फुलला, की संपूर्ण जंगल लाल रंगांनी न्हाऊन निघते.
पळसाच्या फुलांपासून रंगही बनविला जातो. पळसाच्या फुलांना पाण्यात भिजत घातल्यानंतर त्याचा नैसर्गिक केशरी रंग तयार होतो. या रंगानेच ग्रामीण भागात धूलिवंदन, रंगपंचमी साजरे होते. ग्रामीण भागात पळसाच्या पानांचा उपयोग पत्रावळीसाठीही केला जातो.
आयुर्वेदिक महत्त्व
प्राचीन काळापासून पळसाचा आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले, तर त्वचारोग नाहीसा होतो, असे आयुर्वेदात म्हटले आहे. पळसाच्या बियांचाही औषधासाठी वापर केला जातो, अशी माहिती रोहिणी यांनी या व्हिडिओतून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.