crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शहरात मोटारसायकल चोर मोकाट; 36 तासात 7 दुचाकी लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील विविध परिसरातून ३६ तासात सात मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. शिवाजीनगर हुडको, जैन मंदिर, सरदार पटेल सभागृह, काळेनगर, मानराज पार्क, मुगल गार्डन आणि टेरेसा शाळेमागील मेहरुण ट्रॅक अशा ७ ठिकाणाहून दुचाकी पळवून नेण्यात आल्या आहेत.

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.( In city 7 two wheelers were stolen in 36 hours by motorcycle thieves jalgaon crime news)

जळगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणे, मध्यवर्ती मार्केट आणि घराबाहेरून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यात दिवसातून ८ ते १० मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. दुचाकी चोरीची तक्रार घेऊन गेल्यास पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ होत आहे. दिवसातून आठ मोटारसायकल चोरीची सरासरी झाली आहे.

रात्रीतून एखादी गस्त

सण-उत्सवाच्या काळात नागरिकांची गर्दी वाढते. तसे चोरटे सक्रिय होतात. शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित पोलीस ठाण्याची नियमित रात्रीची गस्त आस्थापना बंदी पुरती उरल्याचे चित्र पाहावयास मिळते. रात्रीतून एखाद्या वेळेस पोलीस गाडी येऊन जाते. रात्रीच्या गस्तीची वाणवा असताना दिवसा पोलीस रस्त्यावर पाहावयास मिळत नाहीत. त्याचा फायदा दुचाकी चोरट्यांनी घेतला आहे. चोरटे पकडले, तरी मोटारसायकल चोरीवर नियंत्रण मिळवणे का अशक्य झाले आहे, असा प्रश्‍न शहरवासीयांना पडला आहे.

मोटारसायकल चोरीच्या घटना

शिवाजीनगर हुडकोत रितेश प्रमोद महाजन (वय २३, रा.गेंदालाल मिल) या तरुणाची स्प्लेंडर प्लस (एमएच १९ डी ९३२१) रविवारी (ता.२९) दुपारी तीनला वाजता चोरीला गेली. पोलीस नाईक राजकुमार चव्हाण हे तपास करत आहेत. मेहरुणच्या अशोक किराणाजवळील संजय बाबुलाल नेवे (वय ५८) यांची टीव्हीएस स्टार प्लस दुचाकी (एमएच १९ डीडी ६७९०) शुक्रवारी (ता.२८) जैन मंदिराबाहेरून चोरीला गेली. पोलीस नाईक योगेश पाटील हे तपास करत आहेत.

कोल्हेनगरातील दिनेश किशोर वाणी (वय ३७) यांची दुचाकी (एमएच १९ बीआर १४०१) सरदार वल्लभ भाई पटेल सभागृहाबाहेरून शनिवारी (ता.२९) रात्री साडेआठच्या सुमारास चोरीला गेली. जिल्‍हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संतोष सोनवणे हे तपास करत आहेत. शिवाजीनगरातील धनाजी काळेनगर भागातून रिक्षाचालक राजू गणपत मोरे (वय ४०) यांची स्प्लेंडर (एमएच १९ ईडी ९८४७) सोमवारी (ता.३०) सकाळी सातला चोरीला गेली.

शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलीस नाईक किशोर निकुंभ हे तपास करत आहेत. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क आरएल रुग्णालयाबाहेरून वादक जयेश प्रमोद विसपुते (वय ३१, रा.स्टेट बँक कॉलनी) यांची हिरो पॅशन-प्रो (एमएच १९ बीआर ०२५७) ही सोमवारी (ता.३०) रात्री साडेआठ सुमारास चोरट्यांनी नेली. शहर पोलिसात दाखल झाला. भारती देशमुख या तपास करत आहेत.

शहरातील खत फॅक्टरी परिसरातील मुगल गार्डन येथील मोहम्मद नूर मोहम्मद इद्रिस (वय ३०) यांची एफ-डिलक्स (एचएच १९ डीएन ५९४४) ही दुचाकी घराबाहेर उभी असताना सोमवारी (ता.३०) रात्री साडेदहाच्या सुमारास चोरीला गेली. शहर पेालिसात गुन्ह्याची नोंद झाली. पोलीस नाईक उमेश भांडारकर हे तपास करत आहेत. शहरातील सेंट टेरेसा शाळेमागील मेहरुण ट्रॅक जवळून सोमवारी (ता.३०) पॅशन-प्रो(एमएच १९ बीपी ११३३) ही दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली. पोलीस नाईक अल्ताफ पठाण हे तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Politics : सावंतवाडीत बहुरंगी लढती? ..तर दीपक केसरकरांना असणार तेलींचं कडवं आव्हान?

Latest Maharashtra News Updates live : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्ज दाखल केला

IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध R Ashwin चा दबदबा; कसोटी क्रिकेटमध्ये ठरला 'येक नंबर'

Anuradha Nagawade : शिवसेनेत प्रवेश अन् हातात एबी फॉर्म! अनुराधा व राजेंद्र नागवडे यांनी बांधले शिवबंधन

प्रदर्शनाआधीच भिडले 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३'; टी सिरीजची CCI कडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT