Jalgaon News : राज्यात महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या काही दिवसांत झाल्या. जळगाव जिल्ह्यातही निवासी उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी दोन पदे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या. (in collector office 1 officer has charge of 6 posts jalgaon news)
मात्र त्या जागेवर नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी रवींद्र भारदे यांच्याकडे तब्बल सहा पदांचे प्रभारी चार्ज आलेले आहेत.
जिल्हा पुनवर्सन अधिकारी म्हणून रवींद्र भारदे यांच्याकडे पद आहे. त्याकडे गेल्या महिन्यात रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी पदाचा प्रभारी चार्ज आला. आता निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची बदली नगरला झाली. त्या पदाचा चार्ज श्री. भारदे यांच्याकडे आहे.
श्री. पाटील यांच्याकडे जिल्हा सैनिक अधिकारीपदाचा चार्ज होतो. तोही श्री. भारदे यांच्याकडेच आहे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी किरण सावंत, राजेंद्र वाघ यांच्या बदल्या झाल्या. त्या पदाचा कार्यभारही श्री. भारदे यांच्याकडे आहे. त्यांच्या पदाचा पदभार असे एकूण सहा पदांचा कार्यभार ते सांभाळत आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री साळी यांची बदली भूसंपादन उपजिल्हाधिकारी सावंत यांच्या जागी झाली आहे. त्यांनी अद्यापपर्यंत पदभार स्वीकारला नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या रिक्त जागी धुळे येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांची बदली झाली.
त्यांनीही पदभार स्वीकारला नाही. रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी अद्याप शासनाने कोणाची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे त्याजागी कोण येणार? याची उत्सुकता आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजा टाकून गेलेले असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने बदलीसाठीच्या फाइल या कार्यालयाकडे पाठवू नयेत, अशा सूचना दिलेल्या आहे. त्यामुळे तुर्ततरी जिल्ह्यात श्री. भारदे यांच्याकडेच सहा पदांचा पदभार राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.