Suspects pour alcohol on a table with a chopper in a hotel. In the second photograph, a chopper is placed on the neck of the hotel manager. 
जळगाव

Jalgaon Crime: जळगावात ‘पोलिसिंग’ संपल्यात जमा; चॉपर लावला...तलवारीने हल्ला.. तरी ‘एनसी’ दाखल

दोन अट्टल गुन्हेगार हॉटेल व्यवस्थापकाच्या गळ्यावर चाकू फिरवतात...पोलिस त्यांना ताब्यात घेत सोडून देतात. नंतर व्हिडिओ ‘व्हायरल’ होतो.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : दोन अट्टल गुन्हेगार हॉटेल व्यवस्थापकाच्या गळ्यावर चाकू फिरवतात...पोलिस त्यांना ताब्यात घेत सोडून देतात. नंतर व्हिडिओ ‘व्हायरल’ होतो. गुन्हेशाखा चौकशीला धावते आणि दोघांपैकी एकाला परत ताब्यात घेत त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करून बोळवण होते.

तोपर्यंत त्याचा दुसरा साथीदार पसार होतो. दुसऱ्या प्रकरणात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या चित्रपटातील डाकूंप्रमाणे आठ ते दहा गुन्हेगार हातात तलवारी घेऊन सुसाट मोटारसायकलींवर येतात. दोन घरांच्या दारांवर तलवारीने हल्ले करतात अन् पळून जातात.

जळगाव शहरातील या दोन्ही घटनांचे ‘व्हायरल’ व्हिडिओ पाहिल्यावर या घटना महाराष्ट्रातील आहेत काय? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक. परंतु, जळगाव शहरातील निष्क्रीय ‘पोलिसिंग’चा परिणाम म्हणून या घटनांची चर्चा सुरु आहे. (In Jalgaon policing has ended crime news)

घटना पहिली : गळ्याला ‘चॉपर’ तरीही अदखलपात्र

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत इच्छादेवी पोलिस चौकीपासून दोनशे मीटर अंतरावर हॉटेल पारस येथे रविवारी (ता.२४) दोन अट्टल गुन्हेगार मद्य पिण्यासाठी आले. चित्रपटातील खलनायकाप्रमाणे टेबलवर मधोमध चॉपर खोचून दोघेही मद्य ढोसताना व्यवस्थापकांनी त्यांना हटकले. व्यवस्थापक ऐकत नसल्याने मद्य पिणाऱ्या दोघांपैकी एक तोच चॉपर व्यवस्थापकाच्या गळ्याला लावला.

नंतर दोघे गळाभेट घेत सारवासारव करीत चॉपर निघून गेले. हा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला. हॉटेल व्यवस्थापक तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेले. एमआयडीसी पोलिसांनी दोघांना उचलून आणले. त्यांची समजूत काढून सोडून देण्यात आले. घटनेचा ‘व्हायरल’ व्हिडिओ पाहून गुन्हेशाखेचे कर्मचारी त्या दोघांचा शोध घेत त्यांच्या तांबापुरा येथील घरावर धडकले. मात्र, घरून एमआयडीसी पोलिस घेऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली.

पुढे माहिती घेतल्यानंतर त्यांना सोडल्याचे समजले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात चर्चा होऊन प्रकरण साहेबांच्या कानी पडल्यावर तडकाफडकी दोघांचा शोध सुरु झाला. त्यापैकी एक (शोएब शेख सलीम ऊर्फ रफत) फरार झाला होता. त्याचा साथीदार रईस शेख रशीद याला पोलिस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चॉपर जप्त केला.

घटना दुसरी : डाकू आले आणि दाखल ‘एनसी’

शिवाजीनगर-धनाजी काळेनगरमधील रहिवासी विशाल वाघ हे सरकारी कंत्राटदार आहेत. रेल्वेसह इतर सरकारी विभागांच्या कामाचे ठेके घेतात. मंगळवारी (ता.२६) भावासमवेत बाहेर गेले असताना रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास हिंदी चित्रपटाप्रमाणे, एखाद्या गावावर सशस्त्र डाकूंचा हल्ला व्हावा तशा वेशात हातात तलवारी घेऊन सात ते आठ मोटारसायकलींवर पंधरा ते अठरा गुन्हेगार आले.

दोन हल्लेखोरांनी हातात तलवारी घेत थेट विशाल वाघ यांच्या आणि त्यांच्या घरासमोरील एका घराच्या पत्र्याच्या शेडवर तलवारीने हल्ला करून शिवीगाळ केली. गंभीर दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रकार आहे.

अदखलपात्रची नोंद

सारिका वाल्मीक वाघ यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात तोतऱ्या गोल्या, केऊर पंधारे, राम लखन, राम मोरे अशांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास काही कारण नसताना मद्याच्या नशेत संशयितांनी फिर्यादीच्या घराचे नुकसान केले, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र तक्रारींची नोंद करण्यात आली.

शिवाजीनगरमध्ये ‘ट्रीपलसीट’ हातात तलवार घेऊन आलेले संशयित आणि दरवाज्यावर तलवार मारताना. दुसऱ्या छायाचित्रात धनाजी काळेनगरमध्ये एका घराच्या दारावर तलवारीने वार करताना.

या तक्रारीनंतर शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सीसीटीव्ही ‘फुटेज’ पाहिले. मात्र, गुन्ह्यात ना तलवार जप्त झाली, ना संशयितांना अटक करण्याची उसंत शहर पोलिसांना मिळाली.

जळगाव हे चंबळचे खोरे की बिहार..?

जळगाव शहरात नेमके कोणाचे राज्य आहे, हेच शहरवासीयांना कळेनासे झाले आहे. व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्यावर पोलिस गंभीर दखल घेत नाहीत. हॉटेल व्यवस्थापकाच्या गळ्यावर चॉपर लावला जातो. दोघा संशयितांची चौकशी करून पोलिस सोडून देतात. दुसऱ्या प्रकरणात एक नाही, दोन नाही...तीन घरांवर पास ते सात मोटारसायकलींवर ‘ट्रीपलसीट’ आलेल्या गुंडांनी दारावर तलवारी मारुन दहशत माजवली.

येताना-जाताना तलवारधारी गुन्हेगारांची टोळी कुणालाच कशी दिसू नये?. जर शहर पोलिस रात्रगस्तीवर असते तर नक्कीच त्यांना हे भयावह चित्र दिसले असते. नाहीच दिसले तर, सीसीटीव्ही बघून तरी, ‘ॲक्शन’ घ्यावी ही साधी अपेक्षा असताना अदखलपात्र नोंदीवर बोळवण होते. त्यामुळे जळगाव शहर हे चंबळचे खोरे की बिहार आहे? असा प्रश्‍न शहरवासीय उपस्थित करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT