Jalgaon News : सध्या शेती बेभरवशाची झाली आहे. कधी अवकाळीचा फटका, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, अशा एक ना अनेक समस्यांनी शेतकरी त्रासला आहे. कधी पीक येत नाही, आले तर त्यांना भाव मिळत नाही. (In three years 325 farmers start sericulture farming jalgaon news)
कधी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतित असतो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळला आहे. दरमहा मिळणारे हमीचे उत्पन्न, एकदाच करावी लागणारा लागवड खर्च अन् उत्पादनाला मिळणारा चांगल्या भावामुळे तीन वर्षांत ११० शेतकऱ्यांवरून ३२५ शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली आहे. त्यातून आर्थिक विकासही साधला आहे.
उत्तर महाराष्ट्रात कृषी संपन्न म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यातील केळी मुख्य पीक आहे. केळीसोबतच कापूस, सोयाबीन, कांदा, मका ही पिकेही मुख्यत्वे घेतली जातात. मात्र, पडणारा दुष्काळ, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे शेतकरी खचून गेला आहे.
कधी कधी पिकांना लावलेला खर्चही वसूल होत नाही. यावर उपाय म्हणून शेतकरी रेशीम शेतीकडे वळू लागला आहे. शाश्वत उत्पन्नाचा पर्याय म्हणून शेतकरी रेशीम शेतीकडे पाहू लागला आहे. २०२३-२४ साठी ‘मनरेगा’ योजनेंतर्गत तीन वर्षांसाठी तीन लाख ५८ हजार ११५ रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
३२५ शेतकऱ्यांची नोंदणी
२०१८ ला प्रयोगीक तत्वावर ११८ शेतकऱ्यांनी सहभाग घेउन तुतीची लागवड केली होती. २०२२-२३ मध्ये २५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. २०२३-२४ मध्ये ३२५ नोंदणी केली आहे. २०२२-२३ मध्ये जुनी लागवड १ लाख ११ हजार अंडीपुंज होती. त्याद्वारे ७५ हजार २०२ कोषांचे उत्पादन मिळाले. नवीन लागवड ११ हजार १५० अंडीपुंज झाली. ३ हजार ६२५ कोष उत्पादन मिळाले. एकूण ७८ हजार ८१७ कोष उत्पादन झाले.
"रेशीम शेतीत पहिल्या वर्षी उत्पन्न कमी आले. दुसऱ्या वर्षापासून चांगले उत्पादन मिळत आहे. साडेसहा एकर जमिनीवर तुतीची लागवड करतो. वर्षाला लाखांचे उत्पन्न मिळते. बीड, जालना, औरंगाबाद याठिकाणी रेशीम विक्री करतो. दर महिन्याला रेशीम विक्रीतून चांगला उत्पन्न मिळते." -राजेश पाटील, जळके
"रेशीम शेतीला खर्च कमी येतो. एकदा लागवड झाली, की बारा वर्ष पुन्हा लागवडीची गरज नाही. ‘पोकरा’, ‘मनरेगा’ या योजनेतूनही अनुदान लागवडीसाठी मिळते. शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयात शेतकऱ्यांनी संपर्क साधावा." -पवन कळमकर, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक, जिल्हा रेशीम कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.