Conceptual photograph of the bridge. esakal
जळगाव

Jalgaon News : पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे आज लोकार्पण; जळगावच्या विकासाचा सेतू ठरणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव शहराचा विकासाचा सेतू व वाहतुकीसाठी सोयीच्या ठरणारा पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे रविवारी (ता. १७) सायंकाळी पाचला लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथून हा कार्यक्रम होणार आहे.(Inauguration of Pimprala Railway Flyover today jalgaon news)

जळगाव येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित राहतील. राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या ‘महारेल’ (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) द्वारे पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.

या‌ उड्डाणपुलामुळे शिवाजीनगरसह पिंप्राळावासीयांची वाट सुकर होणार आहे. उड्डाणपूल उभारणीसाठी १२ सप्टेंबर २०२२ मध्ये पिंप्राळा रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. जळगाव ते शिरसोली स्थानकादरम्यान असलेल्या पिंप्राळा रेल्वे फाटक क्रमांक १४७ वर असलेला हा रेल्वे उड्डाणपूल दोन‌ लेनचा आहे. पुलाची लांबी १००५.६२ मीटर असून, रुंदी ८.५ मीटर आहे.

५३ कोटी ९१ लाख खर्च आला आहे. रिंगरोडपासून सुरू झालेला हा उड्डाणपूल थेट कानळदा रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांना राज्यमार्गावरून थेट चोपडा तालुक्याकडे मार्गस्थ होता येणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा एक आर्म पिंप्राळा उपनगराकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही दूर होणार आहे.

उड्डाणपुलाचे कामकाज गतीने पूर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी जळगावचे उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले, तर एमजीएनएफ फेलो दुशांत बांबोळे यांनी समन्वय साधला असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

पुलाचे ठळक वैशिष्ट्ये

- पुलाच्या कामात ‘कंपोझिट’ स्टील गर्डर्सचा वापर

- आरसीसीचे ५४ गर्डर्सचे काम

- पुलाच्या सुरक्षेसाठी ‘क्रॅश बॅरियर’ या नव्या प्रणालीचा वापर

- अनेक केबल्स लाइन्स आहेत ज्या सामान्यतः पुलांच्या मार्गावरून जातात. ज्यामध्ये विद्युत लाइन्स, टेलिफोन लाइन्स इत्यादी तारा हानिकारक असू शकतात आणि अपघातास आमंत्रण देणारे ठरू शकतात. हे टाळण्यासाठी ‘महारेल’ने केबल्सच्या वितरणासाठी पुलावर ‘क्रॅश बॅरियर्स’मध्ये एक स्वतंत्र केबल डक्ट सुरू केला आहे.

- रात्रीच्या दृष्यमानतेसाठी दूरस्थ नियंत्रित ‘थीम’वर आधारित एलईडी पथदीप, सजावटीच्या कमानींसाठी एलईडी दिव्यांची सुविधा

- विशेष सण आणि स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी आणि इतर प्रसंगी संपूर्ण पुलावर बहुरंगी प्रकाशयोजना

- इलेक्ट्रो केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीईसीआरआय)द्वारे विकसित केलेल्या इपॉक्सी पेंट सिस्टमचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT