Death esakal
जळगाव

Jalgaon News : धक्कादायक! नळाला पाणी आलं अन् लेकरांना अनाथ करून गेलं

पाण्याची मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा मृत्यू ओढावल्याची घटना शनिवार (ता.१०) दोनगाव खुर्द(ता.धरणगाव) येथे उघडकीस आली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नळाचे पाणी आले असताना व त्यासाठी पाण्याची मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा मृत्यू ओढावल्याची घटना शनिवार (ता.१०) दोनगाव खुर्द(ता.धरणगाव) येथे उघडकीस आली.

विजया राहुल पाटील (वय २४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. (incident married woman died due to electric shock installing water motor at Dongaon Khurd jalgaon)

कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विजया राहुल पाटील या विवाहिता पती व दोन मुलांसह राहत. शनिवार (ता.१०) रात्री आठच्या सुमारास पालिकेतर्फे नळाला पाणी सोडण्यात आले होते.

नळाला पाण्याची मोटार लावतांना विजया पाटील यांना विजेचा जबरदस्त झटका लागून त्या जोराने जमिनीवर फेकल्या जात बेशुद्ध झाल्या.

आवाज आल्याने कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी विजया यांना शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. विजया यांच्या मागे पतीसह दोन अपत्य असून त्यांच्या मृत्यूने मुलांचे मातृछत्र हरपले.

पाण्यासाठी मरमर

धरणगाव तालुक्यात बहुतांश गावात ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पालिका-ग्रामपंचायतीकडून होणारा पाणी पुरवठा अवेळी आणि कमी दाबाने होत असल्याने पाण्यासाठी गृहिणींचे हाल होतात.

मिळेल तितके पाणी साठवण्यासाठी महिलांची लगबग सुरु असते.त्यातूनच दोनगावातील विजया यांचा मृत्यू ओढवल्याची हळहळ ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT