NMU News esakal
जळगाव

NMU News : क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात 15 वर्षांनंतर वाढ; महाविद्यालयीन खेळाडूंना लाभ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील आंतरविभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिकात्मक अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. (Increase subsidy sports events after 15 years Approval of nmu Management Council Benefits to college athletes jalgaon news)

आंतरविभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयांना विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंनी समिती स्थापन केली होती. या समितीने शिफारस केलेला अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला.

पंधरा वर्षांपासून वाढ नाही

सन २००७-०८ पासून प्रतिकात्मक अनुदानात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक महाविद्यालये स्पर्धा घेण्यास इच्छुक नसतात. समितीने आपल्या शिफारशींमध्ये स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाविद्यालयांना दिले जाणारे टोकन अनुदान वाढविण्याची शिफारस केली होती. समितीच्या या अहवालाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.

३२ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा विद्यापीठाकडून आयोजित केल्या जातात. आयोजनासाठी आता विद्यापीठाने प्रतिकात्मक अनुदानात भरघोस वाढ केली आहे.

विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील इनडोअर हॉल, विविध मैदाने, जलतरण तलाव यासाठी नियमावली करण्याकरिता अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. विद्यापीठातील इनडोअर हॉल, बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस स्पर्धा असोसिएशन यांना भाडे तत्त्वावर वापराला देण्यासाठी या समितीने नियमावली तयार केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उमवितील खेळाडूंना सवलत

याशिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस, जिमनॅशियम आणि जलतरण तलाव यासाठी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी, अधिकारी कर्मचारी आणि बाहेरील व्यक्ती यांच्यासाठी देखील वेगवेगळे शुल्क आकारणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या शुल्काला आणि नियमावलीच्या शिफारशींना व्यवस्थापन परिषदेने सोमवारच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

विद्यापीठ परीसरातील विद्यार्थ्यांकरिता जलतरण तलाव शुल्क कमी करण्याचा निर्णय देखील व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. जे विद्यार्थी विद्यापीठ परिसरातील प्रशाळांमध्ये शिकतात त्यांना यापूर्वी जलतरणासाठी ४०० रुपये मासिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून मासिक भाडे केवळ १०० रु. आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या मागच्या बैठकीत आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ३००ऐवजी ४५० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

बैठकीस प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भुकन, प्रा. सतीष कोल्हे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, भरत गावित, अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा. महेंद्र रघुवंशी, प्रा. पवित्रा पाटील, संदीप पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा. दीपक दलाल हे उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी शेवटी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT