Sesame Ladoo Revadi  esakal
जळगाव

Jalgaon News : तिळगुळाचा गोडव्याला महागाईचा तीट

मकरसंक्रांतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वी बाजारात पांढऱ्या रंगाची तीळ, गूळ विक्रीसाठी आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मकरसंक्रांतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वी बाजारात पांढऱ्या रंगाची तीळ, गूळ विक्रीसाठी आला आहे.

त्याची मागणी वाढली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत. त्यामुळे या गोडव्याला महागाईची किनार दिसून येत आहे. तिळाचे भाव २०० ते २२० रुपये तर गुळाचे भाव ५५ ते ६० रुपये किलो याप्रमाणे आहे. (increasing price of White Sesame jaggery in market due to makar sankranti jalgaon news)

मकरसंक्रांतीचा येत्या सोमवारी आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये तीळ-गुळासह वाणाचेही साहित्य विक्रीसाठी दखल झाले असून विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षांपूर्वी तिळाची किंमत ११० ते ११५ रुपये प्रति किलो अशी होती.

त्याच तिळाचे भाव आज दुप्पट झाले आहेत. मकर संक्रांतीसारख्या सणासाठी महिला तीळ-गुळाचे लाडू व वड्या बनवतात. घाऊक किराणा बाजारात पांढऱ्या रंगाचे तिळाचे भाव २०० ते २२० तर सर्वसाधारण तीळ २४० ते २५० रुपये किलो दराने मिळत आहे.

यंदा तिळाचे व गुळाचे भाव वाढल्याने तीळ-गुळाची चव कडवट होणार आहे. तिळाचे लाडू करण्यासाठी लागणारा गुळाचा भाव गतवर्षी ५० रुपये होता. यंदा गावरान गुळाचा भाव ५५-६० रुपये आहे.

तिळगुळासोबत हलवा तीस रुपये दराने उपलब्ध आहे. हलव्यासोबतच तिळाच्या रेवड्या, लहान चक्की विक्रीला आहे. रेवडी सत्तर रुपये पाव, चिक्की, लाडू ८० रूपये पाव दराने ते उपलब्ध आहे. हलवा, लाडूला चांगली मागणी आहे.अविनाश मोहळकर, तिळगुळ विक्रेते, जळगाव

तिळाचे असे आहेत फायदे..

दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. तीळ खाण्यामुळे त्वचा मुलायम राहते. तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्वचा कोरडी पडत नाही.

ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते. केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.

थंडीच्यावेळी लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमविण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT