Inspector General of Police Dattatraya Karale esakal
जळगाव

Jalgaon News : खरं-खरं सांगा मी, या जिल्ह्यात काम केलय : आयजी कराळे

नाशिक परिक्षेत्रीय पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आज जळगाव जिल्‍हा दौऱ्यावर होते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नाशिक परिक्षेत्रीय पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आज जळगाव जिल्‍हा दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना त्यांनी, प्रतिबंधात्मक कारवाईच्या सूचना दिल्या. दंगली,गोळीबाराच्या सतत घटनांबाबत प्रभारींना अधिकाऱ्यांच्या "वन-टू-वन" मुलाखतीतून माहिती घेतली.

श्री कराळे यांनी जळगावला पोलिस अधीक्षकपदी काम केलेले आहे. सध्या जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नवघरे (चाळीसगाव) नव्यानेच बदलून आले आहेत. (Inspector General of Police Dattatraya Karale on tour of Jalgaon district while reviewing background of Lok Sabha elections news)

अशा पार्श्वभूमीवर पोलिस महानिरीक्षकांच्या पहिल्या बैठकीकडे लक्ष होते. जळगावची वाढती गुन्हेगारी, गोळीबाराच्या घटना, दंगली, जबरी लूट आणि कायदा व सुव्यवस्थेची समस्या डोके वर काढत असताना आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झाल्याने प्रेरणा सभागृहात श्री कराळे यांची गुन्हे आढावा बैठक झाली.

मिस्कील चिमटा..

वाढत्या गुन्हेगारीची माहिती घेताना उपाय योजना, बजावलेली कामगिरी जाणून घेतली. एक-दोन प्रभारींनी जादा माहिती सांगितल्यावर श्री कराळे यांनी, नेमकं काय घडलं ते, खर-खरं सांगा चुकीचं काय तरी बोलून तोंडघशी पडू नका. मी स्वतः या जिल्ह्यात काम केलं आहे, मला खडानखडा माहिती आहे.

बरीचशी मंडळी अजूनही संपर्कात आहेत असे सांगताच बैठकीचा तणाव हलका केला. आढावा बैठक आटोपल्यावर आठ उपविभागात कार्यरत असलेले उप अधिक्षकांसोबत वन-टू-वन चर्चा केली.

कारवाया वाढणार

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर गुन्हेगारी नियंत्रणासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया वाढवाव्यात. हद्दपारी, एमपीडीए सह मकोका अंतर्गत कारवायांच्या सुचना त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

बेसिक पोलिसिंग आयजी कराळे

"जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, वाळू-माफियांचा उपद्रव आणि गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिस दलाचे प्रयत्न सुरु आहेत. वरिष्ठ अधिकारी काम करत असून बेसिक पोलिसींग आधुनिक संसाधनांचा वापर करून गुन्हे उघडकीस आणले जात आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत."- दत्तात्रय कराळे (पोलिस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT