blind person esakal
जळगाव

Inspirational Story : अंधत्वावर मात करीत मिळविली रेल्वेत नोकरी

Jalgaon News : गरीब कुटुंबातील जन्मतात दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असलेल्या ज्ञानेश्वर बादशाह (धनगर) या विद्यार्थ्याने अंधशाळेत शिक्षण घेत जिद्दीने रेल्वेत नोकरी मिळविली.

सकाळ वृत्तसेवा

जीवन चौधरी : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील गरीब कुटुंबातील जन्मतात दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असलेल्या ज्ञानेश्वर बादशाह (धनगर) या विद्यार्थ्याने अंधशाळेत शिक्षण घेत जिद्दीने रेल्वेत नोकरी मिळविली. एवढंच नाही तर त्याने नोकरीच्या पहिल्या पगारात त्याने शिक्षण घेतलेल्या अंधशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण दिले. त्याचे हे कर्तृत्व इतरांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. (Inspirational Story Got job in Railways after overcoming blindness)

दहिगाव येथील गरीब कुटुंबातील ज्ञानेश्वर मधुकर बादशाह (धनगर) या विद्यार्थ्याचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण धुळे येथील अंध विद्यार्थी शाळेत झाले. जानेवारी २०२४ मध्ये त्याने मुंबई येथील माटुंगा रेल्वेत वर्कशॉप असिस्टंट म्हणून नोकरी मिळविली. आज त्याचे वय २७ वर्षे आहे.

आई-वडिलांची परिस्थिती बिकट असताना व मुळातच दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असलेल्या या विद्यार्थ्याने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत जिद्दीने शिक्षण घेत पुढील शिक्षण कॉलेज मुंबई येथे घेऊन पदवी मिळविली. १८ जानेवारीला तो माटुंगा येथील रेल्वे वर्कशॉप असिस्टंट म्हणून नोकरीला रुजू झाला. (latest marathi news)

त्याचा पहिला पगार येताच त्याने अंधशाळा धुळे येथील विद्यार्थ्यांना मिष्ठान्नाचे जेवण दिले. विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण व्हावी, त्यांच्यावर जिद्दीचे संस्कार घडावेत म्हणून त्याने हा उपक्रम राबविला. मुळातच आई-वडील मजुरी करून आपला संसार दाखवीत आहेत.

लहान भाऊ भरत उर्फ आबा बादशाह सुद्धा पदवीचे शिक्षण जळगाव येथे घेत आहे. दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असूनही जिद्दीने शिक्षण ज्ञानेश्‍वरने कष्टाचे चीज केले. अशीच जिद्द इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा घ्यावी, असे त्याचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT