Vikram Agnihotri speaking at Rotary Club lecture. Neighbors Ravindra Shirole etc.  esakal
जळगाव

Inspirational News : दोन्ही हात गमावूनही आयुष्याच्या लढाईत अव्वल! देशातील पहिले दिव्यांग वाहन परवानाधारक...

सकाळ वृत्तसेवा

Inspirational News : उच्च दाबाच्या वीजतारांना स्पर्श होऊन झालेल्या अपघातात माझे दोन्ही हात कापावे लागले होते. यात मला पूर्णपणे अपंगत्व आले. या घटनेकडे नकारात्मकतेने न बघता सकारात्मकतेने माझा दृष्टिकोन ठेवला.

हा अपघात माझ्या जीवनासाठी चांगला होता. त्या सकारात्मकतेच्या बळावर मला विक्रम प्रस्थापित करता आले, असे मत प्रेरणादायी वक्ते विक्रम अग्निहोत्री (इंदूर) यांनी व्यक्त केले. (inspirational Vikram Agnihotri country first disabled vehicle license holder jalgaon news)

येथील रोटरी क्लबच्या ६८ व्या पदग्रहण समारंभात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. अग्निहोत्री यांना दोन्ही हात नसताना पहिले अधिकृत वाहन परवानाधारक मिळवलेले देशातील पहिले दिव्यांग व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या नावावर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही नोंद झाली आहे.

रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रवींद्र शिरोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. अग्निहोत्री म्हणाले, की ‘दिव्यांगता’ ही आपल्या शरीराची नसून मनाची मानसिकता असते. आपण जीवनाकडे कशा पद्धतीने बघतो, यावर ते अवलंबून आहे. आपली विचारसरणी जर सकारात्मक असेल तर आपण आपले निश्चित ध्येय गाठू शकतो, मात्र मनातील नकारात्मकता हीच आपली दिव्यांगता असते.

वयाच्या सातव्या वर्षी एका अपघातात उच्च दाबाच्या वीजतारांना स्पर्श झाल्यामुळे माझे दोन्ही हात जळाले. यात दोन्ही हातांना गँगरीन झाल्यामुळे खांद्यापर्यंत हात कापावे लागले. हा अपघात माझ्या जीवनाला कलाटणी देणारा होता. जे होते ते चांगल्यासाठीच होते, या विचाराने माझ्या आई-वडिलांनी मला प्रेरित केले. माझ्या आईने मला पायाने लिहिण्यास प्रवृत्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जी घटना घडली होती, ती स्वीकारून जो व्यक्ती पुढे वाटचाल करतो, तोच जीवनात यशस्वी होतो, हा कानमंत्र माझ्या आई- वडिलांनी माझ्यावर बिंबवला. त्यानंतर मी बी.कॉम, एम.ए चे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या ४४ व्या वर्षी एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले.

सद्यःस्थितीत विकलांगता या विषयावर पीएचडी करीत आहे. मी दोन्ही हात नसताना पोहायला शिकलो, त्यानंतर ज्या गोष्टी अशक्य होत्या, अशा गोष्टीही मी निसर्गाकडून शिकत गेलो. दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर मला वाहनाने जावे लागत होते, यासाठी मला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते.

यावर मात करण्यासाठी २०१५ मध्ये मी पायाने गाडी चालवायला शिकलो. ही गाडी ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाची असल्यामुळे माझे काम अधिकच सोपे झाले. दिव्यांग व्यक्तींना वाहन परवाना दिला जात नाही, यासाठी पाठपुरावा केला अन् अखेर दीड वर्षानंतर मला लायसन्स मिळाले. त्यामुळेच मी देशातील पहिला दिव्यांग वाहनपरवानाधारक बनलो.

त्यानंतर मी ‘कार रेसलर’ बनून रेस कॉम्पिटिशनमध्ये अनेक पदकेही मिळवलेत. याचीच दखल घेत माझ्या नावाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.अजय रोडगे- पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

"जी गोष्ट आपल्या हातातून निघून गेली आहे, त्यावर दुःख करीत बसण्यापेक्षा नव्याने मोठ्या आनंदाने नवीन गोष्टींचा प्रारंभ केला पाहिजे. जीवनात संघर्ष हा गरजेचा असतो, कारण हाच संघर्ष आपल्याला मजबूत करत असतो.

येणाऱ्या परिस्थितीवर आपले कोणतेही नियंत्रण नसते, पण ती परिस्थिती आपण कशी हाताळतो, त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतो हे मात्र आपल्या हातात असते." - विक्रम अग्निहोत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT