International Yoga Day 2023 esakal
जळगाव

International Yoga Day 2023 : ‘योग’ आत्मविश्‍वास, निरोगी जीवनाची गुरुकिल्ली; प्रा. वैद्य एन. बी. स्वामी

सकाळ वृत्तसेवा

International Yoga Day 2023 : जगातील प्रत्येक व्यक्तीला दुःखमुक्त/पीडामुक्त जीवन हवे आहे. आजारमुक्त जीवन हवे आहे, स्वस्थ जीवन हवे आहे, म्हणजेच सुखी जीवन हवे. आज परदेशातही योगाचे आकर्षण वाढत आहे.

यामुळे लहान वयापासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच दररोज योगा केल्यास मन शांत राहून आत्मविश्‍वास, काम करण्याची प्रेरणा, शक्ती, यश, निरोग जीवन मिळते, अशी माहिती येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे स्वस्थवृत्त विभागाचे प्रमुख प्रा. वैद्य एन. बी. स्वामी यांनी ‘सकाळ’ला दिली. (International Yoga Day 2023 Prof Vaidya NB Swami statement On Self Confidence Key to Healthy Life jalgaon news)

बुधवारी (ता. २१) जागतिक योग दिन आहे. त्यानिमित्त ते योगाविषयी माहिती देत होते.

प्रा. वैद्य स्वामी म्हणाले, की जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक संपूर्ण सुस्थिती, अशी संकल्पना पुरस्कृत केली आहे. आरोग्य आनुवंशिकता, परिस्थिती, आहार, विहार व विश्रांती या पाच प्रमुख गोष्टींवर अवलंबून असते. आनुवंशिक व परिस्थिती फारशी आपल्या हातात नसते, पण आहार, विहार व विश्रांती यात आपण आपल्या इच्छेने हितकारक बदल घडवू शकतो.

मानसिक आणि भावनिक ताणतणाव वाढल्यामुळे त्याचे मनोकायिक स्थैर्य व स्वास्थ नाहीसे झाले आहे. यामध्येही योगाचा अत्यंत चांगला उपयोग होतो.

मनातील चित्तवृत्तीचे नियंत्रण करणे म्हणजे योग होय. योग ही चंचल मनाला शांत करणारी प्रक्रिया आहे. जय-पराजय, लाभ-नुकसान, कार्यसिद्धी होते- न होणे आदींमुळे विचलित न होता स्थितप्रत राहणे म्हणजे योग.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ते म्हणाले, की पाच हजार वर्षांहून अधिक परंपरा असणारी ‘योगविद्या’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगशास्त्र मानवाला सुखमय आणि उन्नत जीवनाचा मार्ग दाखवून उत्तम आरोग्य प्रदान करते. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ अर्थात संपूर्ण आरोग्य योगाभ्यासामुळे प्राप्त होते. व्यक्तिगत आणि बौद्धिक विकास झाला. ताणतणाव वाढल्यामुळे त्यांचे यापासून मुक्ती, मानसिक शांती, आत्मविश्वास प्राप्त करण्याचा योग हा उत्तम आणि सोपा मार्ग आहे.

शारीरिक स्वास्थासोबतच संतुलित जीवन योगाद्वारे जगता येते. आपली जीवनशैली, अव्यवस्थित कार्यशैली, विभिन्न भूमिकेमध्ये ताणतणाव वाढत जातो. योगमुळे तणावमुक्ती होऊन संपूर्ण शक्ती प्रदान करते. योगामुळे शरीरात दृढता येते.

स्थैर्य प्राप्त होते. मन एकाग्र होते. आरोग्य उत्तम राहते. शरीर निरोगी राहते. सामान्य बौद्धिक क्षमता प्राप्त होते. निरंतर अभ्यासाने दीर्घायुष्य प्राप्त होते. योगाभ्यासामुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते. आत्मविश्वास वाढतो. व्यक्तिमत्त्व विकास विकसित करून, उत्तम जीवन जगणाचा योग हा उत्तम मार्ग आहे.

विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेत योग केल्यास नेता, कलाकार, वक्ता, शास्त्रज्ञ, योगी उदयाला येतात. सर्दी, जुलाब, जीर्ण रोग, संधिवात, असाध्य दमा, कॅन्सर, अशा पद्धतीने रोगांचे वर्गीकरण होते. यावर उपचार म्हणजे जीवनशैलीत तात्पुरते अथवा कायमस्वरूपी सकारात्मक बदल करणे.

त्याचा परिणाम म्हणून होणारे स्वास्थासंवर्धन आणि रोगकारक अवस्थेचे निराकरण, बदलांना समजून घेऊन जीवनात यांचा अंगीकार करणे, अशा या बहुउपयोगी योगाचा अभ्यास फक्त आंतरराष्ट्रीय योगदिनीच करून उपयोग नाही, तर दैनंदिन जीवनात, आपल्या दिनचर्यात नित्यनियमाने समावेश करावा, हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच दररोज योगाभ्यास करावा.

सर्वेपि सुखित: सन्तु, सर्वे सन्तु निरायम !

सर्वे भद्राणि पश्‍यन्तु मा कश्चित दुःखभाग्भवेत्‌ !!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT