Sunil Jhanwar, Suraj Zhanwar, Paras Lalwani esakal
जळगाव

CBI Inquiry : निंभोरा पोलिसांत दाखल गुन्ह्याचा सीबीआयकडून तपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्थेचा ताबा मिळविण्यासाठी भोईटे गटाकडून अ‍ॅड. विजय पाटील यांचे अपहरण (Abduction) करून डांबून ठेवल्या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Investigation by CBI of crime filed in Nimbhora police Statement of Sunil Zanwar Paras Lalwani are recorded jalgaon news)

हा गुन्हा नंतर पुण्याला वर्ग करण्यात येऊन यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २९ संशयितांचा समावेश होता. पैकी मंत्री महाजन यांच्यासह नऊ संशयितांवर मोक्काअंतर्गत कलम वाढविण्यात आले होते.

या गुन्ह्याच्या तपासाकरिता सीबीआय पथके जळगावात ठाण मांडून आहे. सोमवारी (ता. १३) सुनील झंवर, पारस ललवाणी, नितीन लढ्ढा यांचे जबाब नोंदविण्यात येऊन दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले.

गुन्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांना मोक्काअंतर्गत कलम वाढविण्यात आल्यानंतर विधानसभेत पेनड्राइव्ह कांड गाजले. तत्कालीन विरोधी पक्षनेते विद्यमान गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड. प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन असलेले पेनड्राइव्ह विधानसभेत सादर करून खळबळ उडवून दिली. कालांतराने हा गुन्हा सीबीआयकडे तपासाला देण्यात आला होता. शुक्रवारी याच गुन्ह्याच्या तपासाकरिता सीबीआय अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

शनिवारी १३ लोकांचे जबाब

पथकाने शनिवारी मविप्र संस्थेत धडक देत कार्यालयाची पाहणी केली. हाणामारीच्या घटनांचा सखोल तपास केला. तसेच, तत्कालीन संचालक गोकूळ पिंताबर पाटील, परमानंद साठे, वीरेंद्र भोईटे, महेंद्र भोईटे, शिवाजी भोईटे, अलका पवार, सुषमा इंगळे, जयवंतराव येवले, जयवंतराव देशमुख आदींसह १३ जणांचे लेखी जबाब नोंदवून घेतले.

सुनील झंवर यांनी दिले पुरावे

फिर्यादी विजय भास्कर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ज्या फ्लॅटमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले होते तो फ्लॅट सुनील देवकीनंदन झंवर यांच्या मालकीचा असल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झंवर पिता- पुत्राला अजिंठा विश्रामगृहावर चौकशीसाठी बोलावले होते.

तेथे, चौकशी दरम्यान झंवर यांनी सांगितले, की या फ्लॅटवर माझी मुलगी शिक्षणासाठी राहात होती. नंतर तो रिकामाच होता. असे कधी घडलेच नाही. सोबतच या प्रकरणात मार्च महिन्यातच उच्च न्यायालयात रिटपिटीशन टाकून गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व २९ लोकांचे मोबाईल नंबर व त्यांचे लोकेशन मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार खंडपीठाने आदेश करूनही त्यावर काम झाले नाही.

त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखेच्या सुचेता खेाकले यांनी बीएचआर प्रकरणात सूरज झंवर यांना अटक केल्यावर या फ्लॅटवर केलेल्या पंचनाम्यात लॅपटॉप व काही दस्तऐवज जप्त केल्याचे नमूद केले. त्याबाबत विचारणा केली असता, असेकाही जप्तच केले नाही, असे त्यांनी लेखी स्वरूपात दिल्याचे कागदपत्रे, खंडपीठाचे आदेशाच्या प्रती सीबीआयने ताब्यात घेतल्या.

नितीन लठ्ठा यांचाही जबाब

सुनील झंवर यांच्या जबाबात माजी महापौर नितीन लढ्ढा यांचा उल्लेख आल्याने तत्काळ सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लढ्ढा यांना पचाराण करून स्वतंत्र चौकशी करून दोन्ही जबाबाचा ताळमेळ बसतो का, याची खात्री करून तशा लेखी नोंद घेण्यात आल्या. या गुन्ह्यात पारस ललवाणीसह इतरांचे जबाब घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ॲड. प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणाची चौकशी

सुनील झंवर यांचे जबाब नोंदवत असताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बीएचआर गुन्ह्यात खंडणी मागितल्याचे प्रकरणाची माहिती जाणून घेतली असून, त्या गुन्ह्याच्या घटनाक्रमासह ध्वनी-चित्रमुद्रित पुरावे, दस्तऐवज ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT