Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news esakal
जळगाव

Jalgaon News: आयुक्तांवरील अविश्‍वास प्रस्तावाचा मुद्दा पेटला! उद्या महापालिकेसमोर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नगरसेवकांनी एकीकडे महापालिका आयुक्तांविरोधात अविश्‍वासाची तयारी सुरू केलेली असताना, काही संघटनांनी आयुक्तांच्या बाजूने उभे राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात विशेषत: मागास संघटना एकत्रित आल्या असून, त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देत नगरसेवक त्यांच्या अपयशाचे खापर आयुक्तांवर फोडत असल्याचा आरोप केला आहे. (issue of no confidence motion on commissioner flared up Protest in front of Municipal Corporation tomorrow Jalgaon News)

नगरसेवक आक्रमक

जळगाव शहरातील रस्त्यांची समस्या, स्वच्छता होत नसल्याच्या वाढत्या तक्रारी, आरोग्य सुविधांचा अभाव ही सर्व स्थिती प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झाल्याचा दावा करत भाजप नगरसेवक डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी तीनदिवसीय उपोषण केले.

त्यांच्या या उपोषणाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अखेरीस सर्व नगरसेवकांनी आक्रमक होत यासंदर्भात आयुक्तांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणायचे ठरविले. तसा प्रस्ताव महापौरांकडे दिला. महापौर जयश्री महाजन यांनीही तो दाखल करून घेतला आहे.

ठेकेदारीच्या बिलांसाठी नगरसेवकांचे आंदोलन

जळगाव महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांच्या कारभारामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.

त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येऊन आमची ठेकेदारीचे बिले निघत नाहीत आणि रस्त्यांची कामे होत नाहीत व इतर विकासकामांना अडथळा येतो, म्हणून प्रशासनाला दोषी धरून आयुक्त विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे ठरविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्या पाच वर्षांपासून नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या काळात जळगावच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. माणसे मुठीत जीव धरून प्रवास करत असतानाही कोणत्याही नगरसेवकाने त्याविरुद्ध आवाज उठवला नाही किंवा आंदोलन केले नाही.

निष्पाप जीवांचा बळी गेला, तरी तथाकथित नगरसेवकांना पाझर फुटला नाही. आता स्वतःची नामुष्की व अकार्यक्षमता दुसऱ्याच्या माथी मारण्यासाठी त्यांनी आयुक्तांना निवडले आहे, असे संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच या प्रकरणात आयुक्तांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णयही या संघटनांनी घेतला आहे.

या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, विजय पाटील, करीम सालार, रमेश सोनावणे, जगदीश सपकाळे यांच्या नेतृत्वात शहरातील २५ पेक्षा जास्त संघटना या नगरसेवकांचा कारभार उघडा पाडण्यासाठी १ ऑगस्टला सकाळी दहाला महापालिकेसमोर उभे राहून नगरसेवकांना एक आवाहन करणारे पत्र देणार आहेत.

या संघटनांचा सहभाग

लोक संघर्ष मोर्चा, जनक्रांती मोर्चा, संविधान जागर समिती, भीम रमाई प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन शिक्षक संघटना, अनुसूचित ठाकूर जमात सेवा मंडळासह अन्य संघटनांचा यात सहभाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT