Jalgaon Crime News : जन्मठेपेच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या चेतन आळंदे ऊर्फ चिंग्या हा दुसऱ्या गुन्ह्यात कारागृहात आला असताना गेल्याच महिन्यात त्याने जेल बदलीवरुन गोंधळ घातला होता.
त्याच्याच टोळीतील लखन मराठे याने मंगळवारी (ता.१७) कारागृहात गोंधळ घालत जेलरच्या केबीनची काच फोडून फोन तोडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Jail superintendent abused by criminal jalgaon crime news)
गोळीबार प्रकरणातील संशयित लखन ऊर्फ गोलू दिलीप मराठे हा न्यायालयाच्या आदेशानुसार (ता.३) ऑगस्टपासून जळगाव कारागृहात आहे. त्यानंतर न्यायदंडाधिकारी जळगाव यांनी (ता.१३ ऑक्टोबर) रोजीच्या आदेशानुसार त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परिणामी जळगाव मुख्यालयातील पथक नेहमीप्रमाणे (ता. १७) रोजी सकाळी ११ ला जळगाव कारागृहातून नेण्यासाठी जेलगेटवर दाखल झाले.
आपल्याला न सांगता आपली नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे बंदी लखन यास नातेवाइकांची भेट घेत असताना सांगण्यात आले. आपल्याला अचानक नाशिकला नेले जात असल्याने लखनला याचा राग आला.त्याने जोरजोराने जेलर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
त्यानंतर कारागृह अधिक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस खिडकीची लोखंडी जाळी तोडून केबीनची काच तोडून तुरुंग अधिक्षक ए.आर. वांडेकर यांना शिवीगाळ केली.
कानळदा रोडवरील केसी पार्क येथील वाळू व्यावसायिकाच्या घरावर खंडणीसाठी दगडफेक करुन गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात लखन ऊर्फ गोलू मराठे हा कारागृहात असून त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न गोळीबाराचे गुन्हे दाखल आहे.
चिंग्याचा साथीदार
२ ऑक्टोबरला चेतन सुरेश आळंदे ऊर्फ चिंग्या याची अशाच पद्धतीने न्यायालयीन आदेशाने जेल बदली करण्यात येऊन त्यालाही नाशिक रवाना करण्यात आले. त्यानेही गोंधळ घालून कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून जाण्यास नकार दिला होता.
नंतर जिल्हापेठ पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्याची रवानगी करण्यात आली होती. याच चिंग्या टोळीचा साथीदार असलेला लखन ऊर्फ गोलू दिलीप मराठे याची देखील आज नाशिक रवानगी करण्यात आल्याने त्याने तसाच गोंधळ घातला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.