Lok Sabha Election  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार

Jalgaon News : मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय, बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावेळी मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय, बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात १३ मेस मतदान होणार आहे. (Jalgaon 12 proofs will be considered for identification at time of voting)

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना (लायसन्स), केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक, टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅनकार्ड.

रजिस्टर जनरल ऑफ इंडियाद्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड, भारत सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड. (latest marathi news)

छायाचित्र असलेले निवृत्तिवेतनाची कागदपत्रे, खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी आवश्यक असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

IPL Auction 2025: कोण आहे गुरजपनीत सिंग, ज्याच्यासाठी CSK ने ३० लाखापेक्षा ७ पटीने पैसे ओतत कोट्यवधी रुपयांना केलं खरेदी

Car Accident : इंदापूरजवळ कारच्या अपघातात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT