Fund  esakal
जळगाव

Jalgaon News : हतनूर अंतर्गत 1507 घरांचे पुनवर्सन होणार

Jalgaon : मुक्ताईनगर व रावेर विधानसभा मतदारसंघातील यापूर्वीच ८ गावांचा पुनवर्सनाबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागास सादर करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात हतनूर पुनवर्सन अंतर्गत हतनूर धरण (ता. भुसावळ) जलाशयाच्या बॅकवॉटरमुळे बाधित होणाऱ्या मौजे मुक्ताईनगर येथील ४१३ घरे, मौजे नेहेते येथील १८२, मौजे वाघाडीतील ४६३ व मौजे ऐनपूर येथील २५०, मौजे भामलवाडीतील १९९, असे एकूण १५०७ घरांच्या भूसंपादन व पुनवर्सन करण्यास नियामक मंडळाची मान्यता मिळाली आहे. (1507 houses will be renovated under Hatnur )

या भूसंपादन व पुनवर्सनासाठी एकूण ३०१ कोटींच्या खर्चास शासनाच्या मदत व पुनवर्सन विभागाची मान्यता, त्यासाठी आवश्यक निधी मिळण्याची मागणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव (मुंबई) यांच्याकडे नाशिक विभागीय आयुक्तांमार्फत केली आहे. मुक्ताईनगर व रावेर विधानसभा मतदारसंघातील यापूर्वीच ८ गावांचा पुनवर्सनाबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागास सादर करण्यात आला आहे.

त्यानुसार जलसंपदा विभागाने तत्काळ स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात २६ एप्रिल २०२२ ला आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) यांच्या मागणीनुसार झालेल्या बैठकीत मौजे मुक्ताईनगर येथील एकूण १६६४ घर पुनर्वसीत आवश्क असल्यापैकी आजपावेतो १९७२-७३ टप्पा १ मध्ये ८८८ घरे, १९९५ मध्ये टप्पा क्रमांक २ मध्ये १२३ घरे व २००७ मध्ये टप्पा तीनमध्ये २४० घरांचे, असे आजतागायत एकूण १२५१ घरांचे पुनर्वसन झाले आहे. (latest marathi news)

उर्वरित ४१३ घरांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही, याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार मंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार या विभागामार्फत मौजे मुक्ताईनगर येथे पाहणी केली असता, गावातील साधारणत: ४१३ घरे नदीपात्रापासून साधारणतः ४०० ते ५०० मीटर अंतरावर असल्याचे आढळून आली. गावाचा तलांक २२५ ते २३० मीटरदरम्यान आढळून आला.

परिस्थितीचे निरीक्षण केले असता, नागरिकांना धरणाच्या पाण्यापासून अप्रत्यक्ष त्रास आहे. पुर्नवसन करावयाचे झाल्यास ४१३ घरांचे पुर्नवसनासाठी अंदाजे रक्कम ११० कोटी खर्च अपेक्षित आहे. मौजे नेहते (ता. रावेर) गावातील अंदाजे १८२ घरे तापी नदीकाठावर आहेत. धोकादायक बाधित घरांचे भूसंपादन व पुनर्वसनासाठी एकूण २४ कोटी लाख खर्च अपेक्षित आहे. मौजे वाघाडी (ता. रावेर) गाव तापी नदीला मिळणाऱ्या नाल्यालगत तिरावर आहे.

गावातील एकूण ४६३ कुटुंबे बाधित झाली आहेत. या घरांचे भूसंपादन व पुनर्वसनासाठी १०० कोटी ९३ लाख खर्च अपेक्षित आहे. मौजे ऐनपूर येथील २५० घरांचे पुनर्वसन व भूसंपादनास व नागरी सुविधांसाठी ३९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मौजे भामलवाडीतील १९९ घरांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी पत्रात केली आहे. घरांच्या पुनर्वसनासाठी गृहसंपादन, भूसंपादनासाठी व नागरी सुविधांसाठी २६ कोटी ४९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT