Jalgaon Crime : जळगाव येथील संशयितांनी स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती घेण्याच्या बहाण्याने पुण्यातील एकाचे अपहरण करून तब्बल १६ लाख रुपयांची क्रिप्टो-करन्सी ट्रान्स्फर करून गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हा घडल्या पासून संशयित कानळदा (ता.जळगाव) येथे दडून बसल्याच्या माहितीवरून संशयीतांना अटक करण्यात आली. (16 Lakhs worth of crypto currency by kidnapping)
स्टॉक मार्केट, शेअर बाजार, वायदे बाजारांत गुंतवणुक करून त्यातून श्रीमंत होण्याची स्वप्ने प्रत्येकच व्यक्ती पाहायला लागला आहे. परिणामी गुंतवणुकीचे मार्गदर्शन आणि शेअरबाजारात खेरदी-विक्री करण्याबाबत प्रशिक्षण देणारे तज्ञ आणि संस्था कार्यरत झाल्या आहेत.
पुण्यातील अशाच एका मार्गदर्शक कोर्स चालवणाऱ्या व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याच खात्यातील १६ लाख रुपयांची क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेण्यात आल्याची घटना (ता.२२) जुलैस उघडकीस आली.
अपहरण करून ट्रान्स्फर
पोलिस तपासात फिर्याद आणि संशयितांच्या कबुलीनुसार, पुणे बावधन येथील उमेश त्र्यंबकेश्वर हेडाऊ हे शेअर बाजारात स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करतात. मयूर अमोदकर सहित त्याच्या साथीदारांनी स्टॉक मार्केटबाबतच्या कोर्सची माहिती घेण्याच्या बहाण्याने उमेश हेडाऊ यांच्याशी (ता.२२) संपर्क साधला.
पुण्याच्या बालेवाडी परिसरात हाय स्ट्रीटवरील थर्ड वेव्ह कॅफे समोरून हेडाऊ चाकूचा धाक दाखवून हेडाऊ यांचे अपहरण करून संशयितांनी त्यांना गाडीतून शिक्रापूर येथे आणले. जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या मोबाईलमधील 'फायनान्स एक्स्चेंज अॅप्लिकेशन'मधून १६ लाख २ हजार ५१० रुपयांचे युएसडीटी क्रिप्टो करन्सी बळजबरीने ट्रान्स्फर करून घेतली. (latest marathi news)
पोलिसांना मिळाला सुगावा
घटनेनंतर उमेश त्र्यंबकेश्वर हेडाऊ (वय २६, ड्रीम रिधम सोसायटी, बावधन) यांनी पुण्याच्या चतुःशृंगी पोलिस ठाण्यातील तक्रारीवरून गुन्हा दाखल होऊन तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना संशयितांची चौकडी जळगाव येथील असल्याचे समोर आले.
त्यात, मयूर कैलाश अमोदकर (वय २५, रा.रामेश्वर कॉलनी) आणि मनीष राजेंद्र भोंडे (वय २४, रा. मोहाडी रोड,जळगाव) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेल्या इन्व्होवा सह दोघांना अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.शिंदे यांच्या न्यायालयात हजर केल्यावर त्यांना तीन दिवसांच्या कोठडीत रवाना करण्यात आले. कोठडीत संशयितांकडून इतर तीन साथीदारांची नावे पुढे आली.
कानळद्यातून तिघांना अटक
गुन्ह्यातील तिघे साथीदार कानळदा गावात चुलत मावशीच्या घरी आल्याची माहिती गुन्हे शाखेचे रवींद्र श्रावण कापडणे यांना मिळाल्यावर त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळविल्याने तत्काळ उप निरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार महेश महाजन, हेमंत पाटील, रविंद्र कापडणे, राहुल कोळी अशांच्या पथकाने कानळदा गावातून जितेंद्र उर्फ जितू प्रदिप वाघ( वय-३२, रा. वाघ नगर जळगाव), भूषण गोकूळ कोळी, (वय २७, रा. समतानगर जळगाव), चंद्रशेखर उर्फ चंदू रमेश देशमुख(वय ३३ रा. महाबळ जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या पथकाला सोपवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.