भुसावळ : जयपूर-हैदराबाद एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील एकाच कुटुंबातील १६ जणांना अन्नातून विषबाधा झाली. मध्य रेल्वेच्या खंडवा स्थानकादरम्यान पोहे व समोसे खाल्ल्यानंतर या प्रवाशांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर तत्काळ खंडव्यात उपचार करण्यात आले.
दरम्यान, सर्व प्रवाशांची प्रकृती स्थित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर हे सर्व प्रवासी पुढील प्रवासाला रवाना झाले. ही घटना बुधवारी (ता. ३१) सकाळी अकराच्या सुमारास घडली. (16 people poisoned in Jaipur Hyderabad)
जयपूर-हैदराबाद सुपर फास्ट एक्स्प्रेस (क्रमांक १७०१९) मध्ये प्रवास करत असताना पोहे व समोसे खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील अनेकांची तब्येत बिघडल्याची माहिती येथे स्टेशन मास्टरला मिळाली. याची माहिती मिळताच खांडव्यात डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले. गाडी स्थानकावर येताच तत्परता दाखवत रेल्वेने जिल्हा रुग्णालयाच्या मदतीने डॉक्टरांचे पथक रेल्वेस्थानकावर बोलावले. गाडी येताच रुग्णांना खाली उतरवून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
...अशी घडली घटना
इटारसीहून बुधवारी सुटणाऱ्या हिस्सार - हैदराबाद एक्स्प्रेसमधून रेल्वेतील प्रवाशांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली. या गाडीच्या कोच क्रमांक एस-३ आणि एस-२ मध्ये हे १६ जण प्रवास करीत असल्याची माहिती मिळताच स्टेशन मास्तरांनी प्रवाशांच्या उपचाराची सर्व व्यवस्था करून गाडी स्थानकावर येण्यापूर्वीच आरोग्य विभागाची संपूर्ण टीम येथे तैनात करण्यात आली होती.
डॉक्टरांचे तीन टेबल तयार केले. सकाळी सव्वाअकराला ही गाडी खांडवा स्थानकावर येताच येथे प्रवाशांवर उपचार सुरू झाले आणि एकूण १६ प्रवाशांवर उपचार करून गाडीला त्यांच्या इच्छितस्थळी रवाना करण्यात आले. (latest marathi news)
रुग्णांवर तत्कार उपचार
डॉ. योगेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाला स्टेशन मास्टर अरविंद शहा यांना जयपूर-हैदराबाद एक्स्प्रेसमधील २० ते २५ प्रवाशांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली. त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. गाही आल्यावर रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यात ११ पुरुष आणि ५ महिला होत्या. प्रत्येकाला वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते.
प्रवाशांना ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी आदींचा त्रास होत होता. सुरवातीला उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी रुग्णांनी नोंदवल्या नाहीत. डॉक्टर शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांनी त्यांना सांगितले, की त्यांनी सकाळी नाश्त्यात पोहे खाल्ला आहे. यानंतर त्यांनी पोटदुखीची तक्रार केली. सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. एकही रुग्ण गंभीर नाही.
सय्यद कुटुंबीयांनी सांगितली आपबिती..
पीडित कुटुंबातील नगमा सय्यद यांनी सांगितले, की छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहोत. दोन दिवसांपूर्वी अजमेर शरीफ दर्ग्यात गेलो होतो. कुटुंबात १२ पुरुष, महिला आणि तीन मुले आहेत.
मंगळवारी रात्री अजमेरहून छत्रपती संभाजीनगरला परतण्यासाठी रेल्वेगाडीत चढलो. रात्री जेवण करून काही वेळातच उलट्या होऊ लागल्या. मुलांना जुलाबाच्या तक्रारी येऊ लागल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांना समस्या सांगितली. खांडवा स्थानकात उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.