cyber crime Sakal
जळगाव

Jalgaon Cyber Fraud : जळगावाच्या डॉक्टराला 19 लाखांचा ऑनलाईन गंडा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Fraud : शहरातील एका डॉक्टरला, ‘मी ईडी ऑफिसमधून बोलतोय, मनी लॉड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आलेय’, अशी बतावणी करून त्यापासून वाचण्यासाठी सातत्याने ऑनलाईन पैसे मागितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सायबर पोलिस ठाण्यात डॉक्टरांनी तक्रार दिली असून, तब्बल १९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. (19 lakhs online fraud to Jalgaon doctor )

५९ वर्षीय डॉक्टरांना १ मेस अंकुश वर्मा आणि सुनीलकुमार नामक व्यक्तींनी फोन केले. ‘आम्ही ईडीच्या ऑफिसमधून बोलतोय. मनी लॉड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आले आहे. त्यात तुमचा सहभाग आहे, असे दिसतेय. त्यातून बाहेर पडायचे असेल, तर आम्ही सांगू तसे वागा’, असे त्या व्यक्तींनी डॉक्टरांना सांगितले.

संशयितांनी त्यांचे बँक खात्याचा क्रमांक पाठवून त्यात पैसे टाकण्यास सांगितले. यामुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी वेळोवेळी १ ते १८ मेपर्यंत १९ लाख २० हजार रुपये जमा केले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर मंगळवारी (ता. २१) त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या डॉक्टरांचे देशविदेशातही रुग्ण असून, ते जळगावातूनच औषध पाठवित असतात, अशी माहिती मिळाली आहे. संशयित अंकुश वर्मा व सुनीलकुमार यांनी डॉक्टरांना पैसे मागण्यासाठी साधे व व्हिडिओ कॉल केले आहेत. संशयित उत्तर भारतातील असण्याची शक्यता आहे. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

नकली आदेशांच्या प्रती

या सायबर गुन्हेगारांनी ईन्फोर्समेंट डायरक्टोरेटच्या डिजींचे लेटर हेड, न्यायदंडाधिकार्यांच्या सहि शिक्कयाची अटक होण्याची नोटीस, उत्तरप्रदेश शासनाची राजमुद्रा वॉरमार्क असलेल्या दस्तऐवज पाठवुन डॉक्टरांना मिती घालून त्यांच्याकडून एकोणीस लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : आमदार राजेद्र शिंगणे यांची अजित पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

बिग बॉस फेम अरमान मलिकचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला जीव, व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT