The front part of the Tavera car was smashed in the bus collision  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : देवळी गावाजवळ बस- तवेरा अपघातात 2 ठार; दोन गंभीर, मृतात चालकाचा समावेश

Jalgaon News : या अपघातात तवेरामधील नऊ मजूर व बसमधील नऊ प्रवासी असे १८ जण जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : डाळिंब बागेची छाटणी करण्यासाठी पैठणकडे जाणाऱ्या मजुरांच्या तवेरा गाडीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एस. टी. बसची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तवेराचालक व मजुराचा समावेश आहे.

या अपघातात तवेरामधील नऊ मजूर व बसमधील नऊ प्रवासी असे १८ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील देवळी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. (Jalgaon 2 killed in Bus Tavera accident near Deoli village marathi news)

या घटनेची माहिती अशी, की सावतावाडी (ता. मालेगाव) येथील १० मजूर पैठण तालुक्यात डाळिंबाची छाटणी करण्याच्या कामासाठी तवेरा गाडीने (क्रमांक- एम. एच. ०४ सीटी २४९२) होते. गाडीत चालकासह ११ जण होते. ही गाडी आज दुपारी दीडच्या सुमारास चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील देवळी गावाजवळून जात असताना समोरून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एस. टी. बसने (क्रमांक- एम. एच. १४ बीटी ०३७५) चुकीच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात बसने तवेरा गाडीला काही अंतरावरपर्यंत घसरत नेले.

धडक बसताच तवेराचा पुढचा भाग पूर्णपणे दाबला गेला. अपघाताच झाल्याचे कळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तवेरामधील जखमींना बाहेर काढण्यासाठी अक्षरशः कसरत केली. अपघाताची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांना समजताच त्यांनी उपनिरीक्षक विकास शिरोळे, जालमसिंंग पाटील, गोपाल पाटील, मिलींद शिंदे, नीलेश लोहार, अशोक राठोड, सुदर्शन घुले, गोरख चकोर, भूषण बाविस्कर, अशोक राठोड, दीपक नरवाडे, ईश्वर देशमुख यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ दवाखान्यात दाखल केले.

दोघांचा मृत्यू, ९ जखमी

या भीषण अपघातात तवेराचालक शेख रहेमान शेख बाबू (वय ३५, रा. अजंग, ह. मु. मालेगाव) व शरद लाखू माळी (वय ३१, रा. सावतावाडी, ता. मालेगाव) हे दोघे जागीच ठार झाले. तर सुनील बाळू पवार, जयवंत नारायण माळी, शंकर काशिनाथ पवार, किशोर सुकलाल सोनवणे, संदीप तुळशीराम माळी, अर्जुन देविदास पवार, भरत लाखू माळी, जयराम मोतीराम माळी, शाम रघुनाथ सोनवणे हे नऊ प्रवासी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासह सर्व जखमींना पुढील उपचारार्थ मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.  (latest marathi news)

बसमधील प्रवासीही जखमी

या अपघातात बसमधील पदमाकर चिंतामण पाटील, रमाबाई पदमाकर पाटील, जिभाऊ शामराव खैरनार, मजासजी मुनीरशहा फकीर (सर्व रा. टाकळी प्र.दे., ता. चाळीसगाव), दिलीप नथू निकम, द्वारकाबाई दिलीप निकम (रा. पाडळदे, ता. भडगाव), सोपान चिंधा पाटील (रा. कजगाव) व निशा चव्हाण (रा. ओढरे, ता. चाळीसगाव) हे प्रवासी जखमी झाले.

या सर्वांवर चाळीसगाव येथील ॲड. वाय. पी. पाटील ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये डॉ. अभिजित पाटील यांनी उपचार केले. पाच प्रवाशांवर किरकोळ मार लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, अधिकार निकम यांनी रूग्णालयांमध्ये रूग्णांची विचारपूस केली.

सावतावाडीचे सरपंच दीपक मोहीते व उपसरपंच बापू शिंदे, सदस्य भारत वेताळ यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार मिलिंद शिंदे, नीलेश लोहो व अशोक राठोड यांनी रुग्णालयात जखमींचे जबाब घेतले. याप्रकरणी बस चालकावर मेहुणबारे पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

तहसीलदारांनी स्वतः केली वाहनाची व्यवस्था

अपघाताच्या घटनेची माहिती कळताच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकाचे सांत्वन केले. यावेळी सावतावाडीचे सरपंच दीपक मोहिते, उपसरपंच बापू शिंदे व भारत वेताळ उपस्थित होते.

जखमींना मालेगाव येथे दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकेकरिता आर्थिक अडचण येत असल्याचे जखमींच्या नातलगांकडून समजताच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन दिली. त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदतही त्यांनी स्वतःतर्फे दिली. तहसीलदारांच्या या माणुसकीच्या दर्शनाने नातलग भारावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT