District Magistrate Mahadev Khedkar, Tehsildar Rupeshkunar Surana during a condolence visit to the victim's family. Pinjari family present. esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेरातील 2 विद्यार्थ्यांचा रशियात पाण्यात बुडून मृत्यू; MBBSच्या शिक्षणासाठी दोघे होते रशियात

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : ‘जिशान बेटा तू पाणी मे मत जा... और जिया को भी बाहर निकाल और जलदी घर पहुँचो... हा अम्मी...’ व्हिडिओ कॉलवरचा हा अखेरचा संवाद... अन् १५ मिनिटांत होत्याचे नव्हते झाले... अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील दोन एमबीबीएसचे विद्यार्थी रशिया येथील वेलिकि नॉवगोरोदच्या नदीत वाहून बेपत्ता झाले. मंगळवारी (ता. ४) रात्री भारतीय वेळेनुसार सव्वा अकराच्या सुमारास व रशिया येथील नऊच्या सुमारास ही घटना घडली. जिशान अशपाक पिंजारी (वय २०) व त्याच्या आत्याची मुलगी जिया फिरोज पिंजारी (२०, दोन्ही रा. इस्लामपुरा अमळनेर) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. (Jalgaon 2 students of Amalner drowned in Russia)

अश्‍पाक मुनीर पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि बहिणीची मुलगी जिया या दोघांना गेल्या वर्षी जुलैमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला वेलिकी नोवगोरोद शहरात रवाना केले होते. ४ जूनला रात्री नऊच्या सुमारास जिशान, जिया, हर्शल संजय देसले (भडगाव, जि. जळगाव) व गुलाम गोस मलिक (मुंबई) हे चार विद्यार्थी शहरातील वोल्कोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते.

नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई शमीमला व्हिडिओ कॉल केला. तेव्हा रात्रीचे सव्वाअकरा वाजले होते. जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे, हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता अन् जणू काही त्याच्या आईला दुर्दैवाचे संकेत प्राप्त झाले होते की काय, लगेच शमीम यांनी जिशान याला सांगितले, की ‘बेटा तू पाणी मे मत जा और जिया को भी बाहर निकाल, और जलदी घर पे पहुँचो...’ आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत त्याने लगेच व्हॉट्सॲपवर संदेश टाकला, की आम्ही घरी जातो.

मात्र अवघ्या १५ मिनिटात नदीला पूर आला अन् क्षणात पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहू लागले. उपस्थितांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात एकीला वाचवण्यात यशही आले. परंतु जिशान आणि जिया यांचा थांगपत्ता लागला नाही. रात्री दोनच्या सुमारास अश्पाक पिंजारी यांच्या तेथील नातेवाइकांनी ही घटना कळवताच कुटुंबाला मोठा हादरा बसला. रात्री सव्वाअकराच्या व्हिडिओ कॉल शेवटचा ठरला.

रशिया येथे तेथील डॉ. दिनेश परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तेथील यंत्रणा विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे. आतापर्यंत एकाचाच मृतदेह हाती लागला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना कुटुंबीयांच्या घरी पाठवले. दोन्ही अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

रशिया येथील सेंट पीटरबर्ग येथील दूतावासातील राजदूत डी. डी. दास यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनीही प्रशासनाशी संपर्क करून मदतीत कोणतीही अडचण येऊ नये, अशा सूचना दिल्या. राजदूत डी. डी. दास यांनीदेखील पिंजारी कुटुंबीयांना योग्य त्या मदतीचे आश्वासन देऊन संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या.

जिशान आणि जिया दोन्हीही सेंट मेरी शाळेचे विद्यार्थी होते. अश्पाक पिंजारी यांनी मुलगा व भाची दोघांना शिक्षणासाठी पाठवले होते. जिशानला एक बहीण आहे, तर जियाला एक भाऊ आहे. अश्पाक पिंजारी हळदीची शेती करतात. (latest marathi news)

भडगावातील विद्यार्थ्याचाही समावेश

रशियात शिक्षणासाठी गेलेल्या येथील हर्षल संजय देसले (वय १९) या विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ४) रात्री अकराच्या सुमारास घडली. याबाबत हर्षल याच्या घरी सकाळी विद्यापीठाकडून निरोप देण्यात आला.

हर्षल हा सहा महिन्यांपूर्वीच रशियात ‘एमबीबीएस’च्या शिक्षणासाठी गेला होता. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने घरी संपर्क साधला होता. त्यानंतर सकाळी त्याच्याशी घरच्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांनी हर्षल रशियात ज्या महाविद्यालयात शिकायला होता, त्याच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती दिली.

ती ऐकून घरच्यांना मोठा धक्काच बसला. आपल्या मुलाच्या संदर्भात घडलेली घटना ऐकून त्याच्या आईने एकच आक्रोश केला. हर्षलचे काका राजेंद्र देसले यांनी ही माहिती दिली. हर्षल हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. हर्षलवर शनिवारी (ता. १५) अंत्यविधी होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT