पारोळा : बोरी धरणाच्या माध्यमातून डावा कालवा व उजवा कालव्यातून बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे दोन्ही कालव्यालगत असलेल्या तब्बल २१ गावांना याचा फायदा मिळणार आहे. तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या बोरी मध्यम धरणातून शहरासह धरणालगत असलेल्या गावाला पाणीपुरवठा होत असतो. (Jalgaon 21 villages benefited from Bori dam diversion)
डाव्या व उजव्या कालव्याच्या गावांना पाण्याची समस्या भासू नये यासाठी तारीख २९ मार्च रोजी बोरी डाव्या कालव्यातून २८ क्यूसेस तर तारीख ३० रोजी बोरी उजव्या कालव्यातून ४२ क्यूसेस पाणी सोडण्यात आले. दरम्यान डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे तामसवाडी ,टोळी, पिंप्री, शेवगे प्र.ब.,सोके, हिवरखेडा, मोंढाळे,करंजी, मुंदाणे या गावाला फायदा होणार आहे.
तर बोरी उजवा कालव्यामुळे टेहू. मेहु , उडणी दिगर, खालसा, उंदिरखेडे, जोगलखेडे, तरडी, देवगाव , तामसवाडी या गावांना फायदा होणार आहे. (latest marathi news)
दरम्यान तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती जाणू लागली आहे. तसेच बोरी धरणातून शहराला देखील पाणीपुरवठा होत असतो.
तसेच कुणाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी कमी होत आहे. दरम्यान डाव्या व उजव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले असून कालव्यालगत असलेल्या गावांनी पाण्याचा वापर योग्य करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.