Jalgaon Banana Crop Damage : तालुक्यात पुन्हा वादळी पावसाचा तडाखा बसला असून, सात गावशिवारातील २४५ हेक्टर क्षेत्रातील केळी पीक उद्ध्वस्त झाले आहे. सुमारे ९८ लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात २६ व २८ मेनंतर सातपुडापर्वत भागात रविवारी (ता. ९) जोरदार वादळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर केळी पीक जमीनदोस्त झाले. (245 hectares of banana crop destroyed by stormy rain )
मोहगण येथील ५० शेतकऱ्यांचे ५५ हेक्टर क्षेत्र, अहिरवाडी येथील ६९ शेतकऱ्यांचे ५९ हेक्टर, पाडळे खुर्द ७२ शेतकऱ्यांचे ६५ हेक्टर, पाडळे बुद्रुक ४५ शेतकऱ्यांचे ३७ हेक्टर, केऱ्हाळे बुद्रुक १५ शेतकऱ्यांचे ८ हेक्टर, केऱ्हाळे खुर्द २१ शेतकऱ्यांचे १२ हेक्टर, मंगरूळ येथील १७ शेतकऱ्यांचे ९ हेक्टर केळी बागा वादळी पाऊस वाऱ्यामुळे भूईसपाट झाल्या असून, रावेर तालुक्यात ७ गावांमध्ये २८९ शेतकऱ्यांचे २४५ हेक्टर केळी बागांचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात तिसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
वीज कोसळून चार जनावरे ठार
शेंदुर्णी (ता. जामनेर) : शिवारात मंगळवारी (ता. ११) पहाटे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्या, पहाटे चारच्या सुमारास वीज कोसळून चार जनावरे ठार झाली. शेंदुर्णी शिवारातील ईश्वर विठ्ठल पाटील यांच्या शेतात तीन वर्षांपासून टेंभी या ठिकाणी मेला मोहन भरवाड हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. (latest marathi news)
त्यांच्याकडे देशी गीर जातीची जनावरे आहेत. त्यावरच कुटुंबाचा चरितार्थ चालतो. दरम्यान, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या गोठ्यात बांधलेले दोन गीर जातीचे बैल आणि दोन गीर जातीच्या गायी यांच्या अंगावर वीज कोसळून चारही जनावरे मृत्युमुखी पडली. या घटनेची माहिती मिळताच तलाठी नाईक, सुरेश कुमावत तसेच पहूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. राठोड व सुपडू मोरे यांनी जाऊन पंचनामा केला.
या पशुमालकाचे सुमारे साडेतीन लाखाहचे नुकसान झाले असून, मेला भरवाड यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्या वेळी सागर पाटील, श्रीकृष्ण चौधरी, युवराज सूर्यवंशी, ईश्वर पाटील, संजय राजपूत, पिंटू पाटील हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.