cm teerth darshan yojana esakal
जळगाव

CM Tirth Darshan Yojana: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत 250 महानुभावीय तीर्थस्थानांचा समावेश! जळगाव जिल्ह्यातील 8 गावांचा समावेश

Latest Jalgaon News : यातील २५२ महानुभावीय तीर्थस्थळे असून, जळगाव जिल्ह्यातील वाघळी, कनाशी, वडधे, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, चांगदेव व हरताळा या तीर्थस्थानाचा समावेश आहे. महानुभाव स्थान महात्म्य अभियानाचे समन्वयक हरिहर पांडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

सकाळ वृत्तसेवा

शहापूर (ता. जामनेर) : राज्य शासनाने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली. शासनाने मंगळवारी (ता. १५) योजनेचा विस्तार करीत भारतातील १५ आणि राज्यातील २८५, अशा ३०० धार्मिकस्थळांचा नव्याने समावेश केला.

यातील २५२ महानुभावीय तीर्थस्थळे असून, जळगाव जिल्ह्यातील वाघळी, कनाशी, वडधे, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, चांगदेव व हरताळा या तीर्थस्थानाचा समावेश आहे. महानुभाव स्थान महात्म्य अभियानाचे समन्वयक हरिहर पांडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. (250 great places of pilgrimage included in CM Tirth Darshan Yojana)

राज्यातील सर्वधर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी १४ जुलैला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. देशभरातील ७३ आणि राज्यातील ६६, अशा १३९ धार्मिक स्थळांना मान्यता दिली होती. त्यात एकाही महानुभावीय तीर्थस्थळाचा समावेश नव्हता. ही बाब श्री. पांडे यांनी शासन-प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयासह नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तीर्थस्थानांच्या यादीसह निवेदन दिले होते.महानुभाव पंथ प्रवर्तक परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात सत्य, अहिंसा, समता, मानवता ही मूल्ये समाजाला दिली. मराठीला ‘लीळाचरित्र’ हा आद्यग्रंथ दिला.

८०० वर्षांपूर्वी श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रात सुमारे २५० गावांमध्ये १६५० तीर्थस्थाने निर्माण झाली, तसेच भगवान श्रीकृष्ण महाराज, श्रीदत्तात्रेय प्रभू, श्रीचक्रपाणी महाराज, श्रीगोंविंद प्रभू महाराज या परमेश्वर अवतारांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली तीर्थस्थाने राज्यातील तीन टक्के, देशातील दीड कोटी आणि जगभरातील कोट्यावधी महानुभावियांचे मोक्षप्राप्तीचे साधन आहे. राज्यात १६ जिल्ह्यांमध्ये असलेल्या या तीर्थक्षेत्रांचा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत समावेश करावा, असे निवेदनात म्हटले होते. (latest marathi news)

महानुभाव तीर्थस्थानांची जिल्हानिहाय गावे-

सातारा- १

अहिल्यानगर - ५०

नाशिक- १२

जळगाव- ८

औरंगाबाद- ४०

जालना- २४

बीड- २४

नांदेड- ६

बुलढाणा- १०

अकोला- ८

वाशीम- १

अमरावती- ५०

वर्धा- १

नागपूर- ४

भंडारा- १

गोंदिया- १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT