Jalgaon News : येथील बाजार समितीत केळीचे भाव जाहीर लिलाव पद्धतीने निश्चित होण्यासाठी विचारविनिमय करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ३०) केळी उत्पादक शेतकरी, केळी व्यापारी आणि बाजार समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे. सभापती सचिन पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली. (30th meeting to announce price of bananas by auction)
श्री. पाटील यांनी सोमवारी (ता. २२) जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांची भेट घेतली. गेल्या महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर रावेर येथे येण्याचे आश्वासन डॉ. प्रसाद यांनी दिले होते.
येथील बाजार समितीतर्फे बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजार समितीच्या धर्तीवर केळीचे भाव जाहीर लिलाव पद्धतीने निश्चित करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. या योजनेला अंतिम रूप देण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसह केळी खरेदीदार व्यापारी आणि बाजार समिती पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होणे आवश्यक आहे. या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. (latest marathi news)
३० जुलैला सकाळी दहाला बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणाऱ्या या बैठकीस जिल्हा कृषी अधिकारी व कृषी अधीक्षक तसेच जिल्हा सहाय्यक निबंधक, बऱ्हाणपूर येथील जिल्हाधिकारी, बऱ्हाणपूर बाजार समितीचे प्रशासक व पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
रावेर बाजार समितीने पूर्वीही एकदा जाहीर लिलाव पद्धतीने केळीची खरेदी-विक्री सुरू केली होती. मात्र, महिनाभरातच ती बंद पडली होती. या पार्श्वभूमीवर बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा सखोल अभ्यास करून नंतरच ही पद्धत सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.