पारोळा : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर पारोळा शहर वसले आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळ्याची ऐतिहासिक वारसासह राजकारणाची परिपक्व पाठशाळा म्हणून तालुक्याची ओळख आहे. मात्र, तालुक्यात कापड दुकान, फटाका फॅक्टरीव्यतिरिक्त रोजगाराची कोणतीही संधी सुशिक्षित बेरोजगारांना नसल्याची मोठी खंत आहे. मात्र, कुटुंब सामान्यासाठी, रिकामे न राहता, हातावर पोट असणाऱ्या ३५ ते ४० सुशिक्षित बेरोजगार फळ विक्री व्यवसायातून आत्मनिर्भर झाले आहेत.(Jalgaon 35 to 40 youth self sufficient from fruit sales)
कोणतीही औद्योगिक वसाहत नसल्यामुळे बरेच सुशिक्षित युवकांनी पारोळा शहरात ऑनलाईन सेंटर, मोबाईल शॉप, रसवंती, हॉटेल, चहाची दुकाने, भाजीपाला, पाणीपुरी विक्री, असे छोटे मोठे उद्योग सुरू केले आहेत. पदवीधर असूनही दुसऱ्याची गुलामी न करता स्वतः आत्मनिर्भर होत फळ विक्रीला पसंती दिली आहे. आंबे, चिकू, सफरचंद, द्राक्षे, सीताफळ, पपई, टरबूज, पेरू स्टॉबेरी व केळीची विक्री करतात. त्यातून जादा नफा न कमविता ग्राहकांचे हित जोपासत आहेत.
इतर तालुक्यांतही व्यवसाय
पारोळा तालुक्यात तामसवाडी, शिरसमणी व बहादरपूर ही तीनच मोठी खेडी आहेत. त्यामुळे तालुक्यात फळ विक्रीला पाहिजे तो प्रतिसाद मिळत नाही. पर्यायाने अमळनेर तालुक्यात बरेच युवक छोटा हत्ती किंवा रिक्षातून फळ विक्री करतात. (latest marathi news)
"पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक अपेक्षा केली जाते. दुसऱ्याची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतः फळ विक्रीला पसंती दिली. या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह समाधानकारक होत असून, रोज पाचशे ते सहाशे रुपये या व्यवसायातून मिळतात."-भूषण महाजन, फळ विक्री व्यावसायिक, पारोळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.