Farmer E-KYC  esakal
जळगाव

Farmer E-KYC : ‘ई-केवायसी’साठी 4 दिवस शिल्लक

Farmer E-KYC : शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत सेतू सुविधा केंद्रात जाऊन ई-केवायसी करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Farmer E-KYC : ‘तालुक्यात अद्याप ४ हजार ११८ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे डाटा ट्रान्स्फर करण्यासाठी महसूल विभागाला अडचण निर्माण होत असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत सेतू सुविधा केंद्रात जाऊन ई-केवायसी करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी केले आहे. वर्ष २०२२ मध्ये सततचा पाऊस व नापिकीमुळे ‌तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ( 4 days left for Farmer E KYC till 30 june)

याबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विविध शेतकरी संघटना तसेच लोकप्रतिनिधींसह प्रसार माध्यमांनी शासनाचे लक्ष वेधून मदतीसाठी प्रयत्न केले होते. सततचा पाऊस व नापिकी संदर्भात तालुक्यात ५८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यापैकी आजवर ५३ हजार ८८२ शेतकऱ्यांची ई- केवायसी सेतू सुविधा केंद्रात करण्यात आली. (latest marathi news)

बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाई देखील जमा झाली आहे. मात्र तालुक्यात अजूनही ४ हजार ११८ शेतकरी ई-केवायसीचे बाकी आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याची ई-केवायसी न झाल्यास त्यास लाभ मिळणार नसून, ती रक्कम शासनास परत दिली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी सेतू सुविधा केंद्रात जाऊन ई--केवायसी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

SCROLL FOR NEXT