Guardian Minister Gulabrao Patil, CEO Ankit and others while giving smartphones to Anganwadi workers and distributing bicycles to disabled people. esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना 4 हजार स्मार्टफोन

Jalgaon : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधी खर्चात जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली असून राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधी खर्चात जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली असून राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. शासन दरबारी जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आज पुरस्कार वितरणात बोलत होते. (Jalgaon 4 thousand smartphone to Anganwadi workers in district)

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअर, अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप, आदर्श शेतकरी पुरस्कारांचे वितरण, महाआवास योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण झाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, महिला बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांना मोबाईलची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. घरकुल महाअवास योजनेत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना सायकलचे वितरण करण्यात आले. धरणगाव तालुक्यात ५०० दिव्यांग बांधवांना सायकली वाटल्यामुळे त्यांच्यात मोठा आत्मविश्वास आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. (latest marathi news)

४ हजार स्मार्टफोन

प्रकल्प संचालक राऊत म्हणाले की, केंद्राच्या पोषण आहार योजनेत ४ हजार ९६ स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झाले.स्मार्टफोनमुळे बालकांची उपस्थिती आहाराचे वाटप कुपोषणाच्या नोंदी ठेवता येणार आहे.

उत्कृष्ट शेतकरी म्हणून अनिल राजाराम ताडे (शिरसोली), भगवान फकीरचंद पाटील (गाढोदा)यांना गौरविण्यात आले. घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणारे गट विकास अधिकारी यावल, गटविकास अधिकारी बोदवड, जामनेर, धरणगाव, भुसावळ येथील गट विकास अधिकाऱ्यांना देखील गौरविण्यात आले.

पंतप्रधान आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोरगाव (ता.जामनेर), देवगाव (ता.पारोळा), खेडगाव (ता.एरंडोल), हिंगणा बुद्रुक (ता.अमळनेर), कानळदा (ता.जळगाव), चिंचोली (ता.यावल) येथील सरपंच ग्रामसेवक यांना मंत्री पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विलास बोंडे यांनी केले. आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT