Guardian Minister Gulabrao Patil esakal
जळगाव

Jalgaon News : धरणगावात 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटी मंजूर! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

Jalgaon News : रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रुग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली आहे. यानिमित्त पालकमंत्र्यांनी धरणगाववासीयांची मागणी पूर्ण केली असून, चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकालगतच्या परिसरात सर्व सुविधांयुक्त उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामासाठी ४० कोटींच्या निधीस मान्यता मिळाली आहे. त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. (Jalgaon 40 crore approved for 50 bed upazila hospital in Dharangaon)

रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रुग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली आहे. यानिमित्त पालकमंत्र्यांनी धरणगाववासीयांची मागणी पूर्ण केली असून, चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे. धरणगाव महत्त्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर आहे. ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकालगतच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी ३९ कोटी ४६ लाख ७५ हजारांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे धरणगावसह परिसरातील एकही रुग्ण आरोग्याच्या सोयीसुविधांपासून वंचित राहणार नसून चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. (latest marathi news)

अशा असतील सुविधा

उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतरुग्ण, माता व बाल संगोपन विभाग, तत्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृह, शवविच्छेदन विभाग, रुग्णवाहिका, नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण, न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटुंब कल्याण सुविधेबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडून मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्तपुरवठा केंद्र असेल.

असे असेल उपजिल्हा रुग्णालय

अंदाजपत्रकात इमारतीचे बांधकाम जी प्लस दोन असून, निवासस्थान (टाईप-१) जी प्लस तीन, निवासस्थान (टाईप-२) जी प्लस तीन, निवासस्थान (टाईप ३) जी प्लस सात, निवासस्थान (टाईप-४) जी प्लस चार आहे. एकूण इमारतीचे क्षेत्रफळ ८०२३.८५ चौरस मीटर आहे. नाशिक प्रादेशिक विभागीय सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता, नाशिक आरोग्य उपसंचालक व जळगाव जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रमाणित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik: काँग्रेसच्या रॅलीतील महिलांचे फोटो काढा, त्यांची व्यवस्था करू, धनंजय महाडिकांची लाडक्या बहिणींना दमदाटी!

Mahayuti: ओबीसी एकीकरणावर भाजपचा भर तर मुख्यमंत्र्यांची मराठा समाजाला साद, काय आहे महायुतीचा प्लॅन?

Latest Marathi News Updates : पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सवलत

Sakal Podcast: अमेरिकेत नोकरीचं स्वप्नं पूर्ण होणार का? ते राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता

Railway: रेल्वेत फुकट्या जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करा; प्रवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT