Water tankers (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : पाणीटंचाई असलेल्या 41 गावांत ‘आबादानी’! पावसामुले टँकरची संख्या घटली; 112 वरून 62 वर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढली आहे. सोबतच टंचाईग्रस्त गांवाची संख्या घटली आहे. उन्हाळ्यात ९४ गावांत ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता ५३ गावांत ६२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जूनमध्ये मुसळधार पाऊस झाला नव्हता. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नव्हती. (Rains reduce number of tankers 62 from 112)

तीव्र उन्हाळ्यात जिल्ह्यात ९४ गावांत पाणीटंचाई होती. त्या गावांत ११३ टँकर सुरू होते. १६६ गावांत १८६ विहीर अधिग्रहण केल्या होत्या. जूनमध्ये सरासरी १६४ मिलीमिटर जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास पुरेसा नाही. जूनमध्ये केवळ १० दिवस तोही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मात्र, जुलैमध्ये पावसाने जोर धरला आहे. जुलैच्या १५ दिवसांत ७९.८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने विहिरींची पाणी पातळी वाढत आहे. गावाकडील ओढे, नाल्यात साठा होत आहे.

सिंचन साठा ३ टक्के वाढ

२०२३ मध्ये जिल्ह्यातील सर्व धरणांत २८.१ टक्के जलसाठा होता. २ जुलैला तो केवळ २४ टक्के होता. आता मात्र २७.६८ टक्के झाला आहे. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यासाठी अजून पावसाची गरज आहे. (latest marathi news)

सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा असा

धरणाचे नाव--यंदाचा जलसाठा

हतनूर--३२.८६ टक्के

गिरणा--११.७४

वाघूर--५३.९८

मध्यम प्रकल्प

गूळ--५५.८१

अग्नावती--०

हिवरा--०

भोकरबारी--०

बोरी--०

अंजनी--०.२५

मन्याड--०

अभोरा--८५.०१

मंगरूळ--७६.२०

सुकी-८५.०१

मोर--६५.६०

बहुळा-११.८८

तोंडापूर--१९.६०

शेळगाव--२९.२५ टक्के

सध्या सुरू असलेले गावे व टँकर असे

तालुका--गावे--टँकर

जामनेर--११--९

भुसावळ--२--३

बोदवड--२--२

चोपडा--३--३

पाचोरा--३--४

चाळीसगाव--२१--३०

भडगाव--७--७

अमळनेर--१--१

पारोळा--६--६

एकूण--५३--६२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT