Jalgaon News : जिल्ह्यातील पाच विविध कार्यकारी संस्था अनिष्ठ तफावतीतून बाहेर पडल्या असून, नियमित संस्थेमधील सभासदांना कर्ज अदा करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या शेती कर्ज व देखरेख विभागाच्या व्यवस्थापकांनी दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (Jalgaon 5 Development Institutions Out of Infidelity Gap Allowance of loan by District Bank)
की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १ एप्रिल २०२४ पासून ५० लाखांवरील अनिष्ठ तफावत असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधील नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना बँकेतर्फे थेट अल्पमुदत पीककर्ज पुरवठा सुरू केला आहे. मात्र, विकास संस्था अनिष्ठ तफावतीतून बाहेर काढण्याची गरज होती.
जिल्ह्यातील पाच संस्था यातून बाहेर पडल्या आहेत. धानोरा (ता. चोपडा) विविध कार्यकारी सहकारी संस्थेने २६ लाखांची अनिष्ठ तफावतीची रक्कम मुदतीत भरली आहे. त्यामुळे ही संस्था अनिष्ठ तफावतीतून बाहेर पडली आहे. (latest marathi news)
भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील विविध कार्यकारी संस्था, जामनेर तालुक्यातील नूतन शहापूर विविध कार्यकारी संस्था, पाचोरा तालुक्यातील तारखेडे येथील विविध कार्यकारी संस्था, मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर विविध कार्यकारी संस्थांनी ५० लाखांवरील अनिष्ठ तफावत कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
अनामत रक्कम संचालक मंडळाने भरून संस्थांना ५० लाखाच्या आत आणले. त्या संस्थांच्या सभासदांना संस्थेमार्फत कर्ज अदा करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व विविध कार्यकारी संस्थाचे चेअरमन, संचालक मंडळांचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, व्हाइस चेअरमन अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.