Bhaskar Bhangale esakal
जळगाव

Jalgaon Crime News : असोद्यात छेडखानीच्या आरोपातून मारहाणीत एकाचा मृत्यू; 6 महिला ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील असोदा गावात शेतासाठी मजुरांना बोलवायला गेलेल्या ४३ वर्षीय शेतकऱ्याचा जमावाच्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ४) दुपारी बाराच्या सुमारास घडली. मुलीची छेड काढल्याच्या आरोपातून महिलांसह संतप्त जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत भास्कर दगडू भंगाळे (वय ४३) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा महिलांना ताब्यात घेतले असून, जळगाव तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा, तर मृताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. (6 women in custody due to one dies after being beaten up on charges of molestation)

असोदा येथे भास्कर भंगाळे पत्नी सुनीता, मुलगा रेहाच व आई कमलबाई यांच्यासह राहत होते. कुटुंबाच्या वडिलोपार्जित शेतीचे काम ते पाहत होते. पावसाळा सुरू झाला असून, शेतात पेरण्यांसह इतर कामे सुरू झाली आहेत. भास्कर भंगाळे गुरुवारी असोदा गावातील मजुरांची वस्ती असलेल्या गोकुळनगरात महिला कामगारांना शेतात कामासाठी बोलवायला गेले असताना, तेथे वाद होऊन महिला मजुरांसह परिसरातील तरुणांनी त्यांच्याशी वाद घालत भांडण केले.

एका महिलेच्‍या घराबाहेर बोलत असताना, मुलीचा हात धरून छेड काढल्याच्या आरोपातून आरडाओरड होऊन काही महिलांसह तरुणांनी भंगाळे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत भंगाळे जागेवरच बेशुद्ध पडल्याने काही ग्रामस्थ व पोलिसपाटलांनी हा प्रकार जळगाव तालुका पोलिसांना कळविला. पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी जखमीला अगोदर रुग्णालयात नेण्याचे सांगितल्यावर साधारण दुपारी दीडच्या सुमारास भंगाळे यांना जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

बेशुद्धावस्थेतील भंगाळे यांची तपासणी केल्यावर डॉ. अश्विन देवरे यांनी त्यांना मृत घोषित केले. हा प्रकार भंगाळे यांचे कुटुंब, नातेवाईक तसेच जळगावात स्थायिक भाऊ लीलाधर भंगाळे यांना कळाल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. जिल्‍हा रुग्णालयातून डॉक्टरांनी पोलिसांना कळविल्यावर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात दाखल झाले.

दरम्यान, मृत भास्कर भंगाळे यांच्या अंगावर कुठलेही व्रण किंवा मारहाणीच्या खुणा आढळून आल्या नाहीत. डाव्या गालावर मारहाणीमुळे सूज आल्याचे दिसले. गुप्तांगाला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय सूत्रांनी दिला आहे. या प्रकरणी चौकशी करून अजून कलमे वाढविण्यात येतील, असे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी सांगितले.

सहा महिला ताब्यात

घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांचे पथक असोदा गावात दाखल झाले होते. घटनास्थळावरून माहिती घेतल्यावर मारहाणीत सहभागी सहा महिलांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांना जळगावला आणले. भंगाळे याने मुलीची छेड काढल्याचा आरोप त्या महिलांनी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

मुंबई हादरली! झोपेतच मृत्यूनं कवटाळलं, भीषण आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, लहान मुलांचाही समावेश

मुन्ना यादव कुटुंबात राडा, एकमेकांवर हल्ला; धंतोली ठाण्यात दोन्ही गटांत गोंधळ, परिसरात तणाव

SCROLL FOR NEXT