Fund  esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यात विकासकामांसाठी 755 कोटींचा निधी मंजूर; जिल्ह्यात शहीद स्मारकं उभारणार

Jalgaon : आर्थिक वर्षात ६५७ कोटींचा निधी विविध विकासकामांसाठी खर्च झाला असून, या आर्थिक वर्षात ७५५ कोटी ९९ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या आर्थिक वर्षात ६५७ कोटींचा निधी विविध विकासकामांसाठी खर्च झाला असून, या आर्थिक वर्षात ७५५ कोटी ९९ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. राज्यात विकासकामांसाठी निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याची आघाडी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या-ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या-त्या गावात शहीद स्मारकं उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, लवकरच त्याबाबत नियोजन केले जाणार आहे. (755 crore sanctioned for development works in district)

जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. त्यात हे ठरले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण ५१० कोटी नियतव्यय मंजूर होता व त्यानुषंगाने संपूर्ण निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झाला होता. प्राप्त निधीमधून ३१ मार्चअखेर ५१० कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आला असून, संपूर्ण वितरित निधी खर्च झाला आहे. (latest marathi news)

अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण ९२ कोटी नियतव्यय मंजूर होता. पैकी सर्व निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आला असून, संपूर्ण वितरित निधी खर्च झाला आहे. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) ५५ कोटी ९२ लाख निधी मंजूर होता. तोही पूर्ण खर्च झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT