Jalgaon News : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या २५८ मिलिमीटर पाऊस (४९ टक्के) झाला आहे. जिल्ह्याची सरासरी ६३२ मिलिमीटर एवढी आहे. शेतकऱ्यांनी ‘खरिपा’च्या ९२.५४ टक्के पेरण्या केल्या आहेत. सर्वाधिक पेरा कपाशीचा ५ लाख ९ हजार ५८ हेक्टरवर झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस होत आहे. (Jalgaon 92 percent sowing of Kharif Crops has been completed in district)
मात्र, चाळीसगाव, रावेर, जामनेर आदी भागांत कमी पाऊस आहे. असे असले, तरी पावसाने सरासरीच्या ४९ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अजून धरणे भरतील एवढा पाऊस झालेला नाही. नद्या, नाले ओसांडून वाहिल्याशिवाय धरणे भरणार नाहीत, असे जाणकार सांगतात.
जिल्ह्यात एकूण खरिपाचे क्षेत्र ७ लाख ७९ हजार ६०१ हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ७ लाख १२ हजार १५३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. कपाशीचे क्षेत्र ५ लाख १ हजार ५६८ हेक्टर आहे. त्या प्रमाणात ५ लाख ९ हजार ५८ हेक्टर (१०१ टक्के) पेरण्या कापसाच्या झाल्या आहेत.
तालुकानिहाय झालेल्या पेरण्या अशा
तालुका--पेरण्या टक्के
जळगाव--९०.४४
भुसावळ--८८.१६
बोदवड--९८.३६
यावल--८५.१२
रावेर--८३.९३ (latest marathi news)
मुक्ताईनर--९५.७६
अमळनेर--९५.४८
चोपडा--८८.४८
एरंडोल--९१.३
धरणगाव--९०.९४
पारोळा--९३.३५
चाळीसगाव--८९.०७
जामनेर--९६.७१
पाचोरा--९९.४४
भडगाव--९६.६८
एकूण--९२.५४
----
"जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांची आता कीटकनाशके फवारणीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांनी फवारणी करताना नाका, तोंडाला मास्क लावावा, द्रावणाचा हाताला स्पर्श होऊ देवू नये. धूम्रपान करून फवारणी करू नये."- के. एम. तडवी, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.