The deceased's father was screaming at the scene of the incident esakal
जळगाव

Jalgaon Crime News: कांचननगरातील तरुणाचे अपहरण करून हत्या! ...तर मुलगा वाचला असता; मृताच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर आक्षेप

Jalgaon News : पोलिसांनी नेहमीच्या बेपत्ता प्रकरणाप्रमाणे ‘चोवीस तास होऊ द्या. मग बघू’, असा पवित्रा घेतल्याने मुलाचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील कांचननगरातील तरुणाला मंगळवारी (ता. ९) सकाळी आठला घरातून बोलावून त्याचे अपहरण करून नेण्यात आले. असोदा शिवारात पाटचारीकडून जाणाऱ्या शेतरस्त्यावर त्याला बैलगाडीच्या शिंगाड्याने बेदम मारहाण केली. अनन्वीत छळ करत मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. संशयितांनी मृतदेह उचलून एका विहिरीजवळ फेकून पळ काढला. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर ऊर्फ पंच्छी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. (Jalgaon abducted boy killed family objected to police)

कांचननगरात ज्ञानेश्वर बाविस्कर आईवडिल, भाऊ, पत्नी व २ मुलांसह वास्तव्यास होता. त्याचे वडील पंढरीनाथ बाविस्कर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असून, सकाळीच ते ड्यूटीवर निघून गेले. सकाळी आठला ज्ञानेश्वरला चार तरुण घरी बोलवायला आले.

त्यांच्यासोबत तो एका वाहनात बसून गेला. सणाचा दिवस असून, ज्ञानेश्वर कुठे दिसत नाही, म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केली. पोलिसांत तक्रार देण्यासाठी पत्नी व आई धडकले. पोलिसांनी त्यांना ‘२४ तास होऊ द्या, तोपर्यंत तुम्ही शोध घ्या, मग आपण हरविल्याची तक्रार नोंदवू’, असे सांगून बसवून ठेवले होते.

असा उघडकीस आला प्रकार

दुपारी दोनला असोदा शिवारात तरुणाचा मृतदेह सापडल्याचे कळाले. तालुका पोलिस ठाण्याची हद्द असल्याने तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाची ओळख पटवल्यावर तो ज्ञानेश्वर बाविस्कर ऊर्फ पंच्छी असल्याचे निष्पन्न झाले. तालुका पोलिसांनी डीवायएसपी संदीप गावित आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर. टी. धारबळे यांना कळविले. घटनास्थळावर खुनाच्या गुन्ह्याची खात्री झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सीक पथकासह दाखल झाले.

यांच्या घरी झाली घरफोडी

मृत ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या शेजारी तथा महापालिकेत चालक म्हणून कार्यरत अश्‍विन ऊर्फ भय्या शंकपाळ यांच्या घरात मध्यरात्री घरफोडी करून संशयितांनी २०३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घरफोडी ज्ञानेश्वर याने केल्याच्या संशयातून साहेबराव वना शंकपाळ, अश्‍विन ऊर्फ भय्या शंकपाळ, पवन चारुदत्त ठाकरे, अजय सोनवणे यांनी सोबत घेऊन गेल्याचे पोलिसांना सांगितले.  (latest marathi news)

छळ अन्‌ मारहाणीत मृत्यू

ज्ञानेश्वर बाविस्कर याच्याविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच संशयातून त्याला संशयितांनी असोदा शिवारात ममुराबादकडे जाणाऱ्या पाटचारीच्या फाट्यावर घेऊन जात लाकडी दांडे, शिंगाड्यांनी बेदम मारहाण केली.

यात ज्ञानेश्वरच्या उजव्या पायाचे हाड मोडून पाय वाकला होता, तर पाठीवर मारहाणीचे ताजे व्रण होते. मारहाणीत ज्ञानेश्वर याचा मृत्यू झाल्याने मारेकऱ्यांनी त्याला उचलून शेत रस्त्याने नेऊन एका विहीरीजवळ मृतदेह फेकून दिला. शेतकरी केशव तिरमाडे शेतात येत असताना, त्यांना मृतदेह दिसल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले.

घरावर गुढी उभारायची तयारी अन्‌ घरचा धनीच गेला!

कांचननगरातील ज्ञानेश्वर बाविस्कर याला सकाळी आठलाच गल्लीतील दोघे- तिघे घरी बोलवायला आले. तो त्यांच्यासोबत निघाला. वडील मनपा पाणीपुरवठा कर्मचारी असल्याने ते कामावर निघून गेले अन्‌ कुटूंबीय गुढी उभारण्यात व्यस्त झाले. इकडे गल्लीत चलबिचल झाल्यावर कुटुंबीयांचा संशय बळावला अन्‌ त्यांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी नेहमीच्या बेपत्ता प्रकरणाप्रमाणे ‘चोवीस तास होऊ द्या. मग बघू’, असा पवित्रा घेतल्याने मुलाचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मंगळवारी (ता. ९) गुढीपाडवा असल्याने कांचननगरवासीय गुढी उभारण्यात लागले. मनपा कर्मचारी पंढरीनाथ बाविस्कर यांच्या घरी दोन तरुण त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर ऊर्फ पंच्छी याला बोलवायला आले. तो त्यांच्यासोबत दुचाकीवर बसून गेला. कुटुंब सणाच्या तयारीत व्यस्त झाले.

दोन-तीन तासांनी गल्लीतील शंकपाळ यांच्या घरी चोरी झाल्याने चलबिचल होत असताना, ज्ञानेश्वरला नेणाऱ्यांनी त्याच्यासोबत काहीतरी बरे वाईट तर केले नसावे, म्हणून ज्ञानेश्वरची पत्नी व आई शनिपेठ पोलिस ठाण्यात धडकले. ठाणे अंमलदाराला त्यांनी माहिती दिली व शोध घेण्याची विनंती केली. मात्र, ‘आताच गेलाय. २४ तास होऊ द्या, तुम्हीपण शोधा. आम्ही माहिती काढतो’, असे सांगत असतानाच शंकपाळ कुटुंब घरफोडी झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात धडकले.

तर मुलगा वाचला असता होऽऽ!

सकाळी घरातून गेलेल्या मुलाच्या मृत्यूची माहिती कळताच पिता पंढरीनाथ बाविस्कर, त्याची आई व पत्नीने असोदा शिवारात धाव घेतली. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडत एकच आक्रोश केला. ‘मारून टाकला हो... मारून टाकला त्यांनी...’ ‘मुलासाठी आम्ही पोलिसांना विनवण्या करीत होतो त्याला शोधा. वेळीच पोलिसांनी हालचाल केली असती, तर कदाचित माझा मुलगा जिवंत असता’, असा टाहो आईवडिलांनी फोडला.

जिल्‍हा रुग्णालयात तणाव

मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात आणल्यावर मृताच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश करत ज्ञानेश्वर बाविस्कर याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप केला. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असतील तर अनर्थ घडला नसता, असे म्हणत जमाव पोलिसांच्या अंगावर धावून आला. परिस्थितीची जाणीव झाल्याने तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात राखीव पोलिस बल पाचारण करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT