Jalgaon crime sakal
जळगाव

Jalgaon : अमळनेरात अल्पवयीन मुलीवर निर्जनस्थळी नेऊन अत्याचार; तरुणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Jalgaon : मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शहरात भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : लहान बहिणीला शाळेत सोडून परत येणाऱ्या अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) शहरात भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास घडली. शहरातील एका महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला ढेकू रस्त्यावरील शाळेत सोडण्यासाठी मंगळवारी (ता. २४) सकाळी अकराच्या सुमारास गेली. (Abuse of minor girl by taking deserted place in Amalner )

तिकडून परत येताना ढेकू रोडवरील दीपक नगरजवळ तिच्या मागाहून संशयित दिनेश रमेश भिल (रा.शांताबाई नगर) हा आला आणि मुलीच्या तोंडावर हात दाबला. समोरून येणाऱ्या रिक्षावाल्याला त्याने सांगितले, की आम्हाला पिंपळे रोडवरील आयटीआयला सोड. रिक्षावाल्याने तेथे सोडल्यावर दिनेशने मुलीला बळजबरीने पिंपळे रस्त्यावरील एका बंद शाळेच्या जिन्यावरून मुलीला गच्चीवर नेले आणि तेथे त्याने मुलीवर अत्याचार केला. पीडित त्याठिकाणी ओरडत होती. परंतु तेथे कोणीच नव्हते.

त्यावेळी दिनेशने मुलीला, ‘तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल’, असे सांगितले. झटापटीत पीडित मुलीचे कपडे फाटले आहेत. दिनेश मुलीला एकटा सोडून गेल्यानंतर मुलगी घाबरून पळत होती. तिला रस्त्यात तिचे आई, वडील भेटले. त्यांना हकिगत सांगितल्यावर आईसोबत येऊन मुलीने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात संशयित दिनेशविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक युवराज बागूल तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT