fire crackers esakal
जळगाव

Jalgaon News : विनापरवानगी फटाके विक्री केल्यास कारवाई! जिल्हा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे नोंदणी आवश्यक

Latest Jalgaon News : किरकोळ विक्रेत्यांसह विविध ठिकाणी छोटी-मोठी दुकाने थाटून विनापरवानगी फटाके विक्री करणाऱ्यांवर प्रशासकीय यंत्रणेकडून थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दिवाळीत फराळ, नवीन कपडे, विविध खरेदीबरोबरच फटाक्यांच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार सर्व बाबींचे काटेकोर पालन करूनच फटाके विक्री करणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांसह विविध ठिकाणी छोटी-मोठी दुकाने थाटून विनापरवानगी फटाके विक्री करणाऱ्यांवर प्रशासकीय यंत्रणेकडून थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (Action will be taken firecrackers sold without permission)

विजयादशमी अर्थात दसऱ्यानंतर आता वेध लागले आहे ते दिवाळीने. दिवाळी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे फटाके विक्रेत्यांसाठी अर्ज प्रक्रियेनंतर त्यांच्या दुकानांची, दुकानातील मालाची माहिती घेऊन परवानगी असलेल्या फटाक्यांना विक्री करण्यास मान्यता दिली जाते.

यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांच्या मान्यता घ्याव्या लागतात. महापालिकेच्या अग्निशमन दलाचा परवाना लागतो. पोलिस आणि इतर ना हरकत प्रमाणपत्र संबंधितांना द्यावे लागते. शहरात या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे.

परवाना आवश्यक

फटाके विक्रीसाठी प्रशासनाचा परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा विनापरवाना फटाका विक्री केल्यास दंडात्मक कारवाई होते.

मोठ्या आवाजाचे फटाके नकोत

शहरात १२५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. कर्कश आवाज करणारे फटाके फोडू नयेत. कमी आवाजाचे फटाके फोडून पर्यावरणाला साथ द्यावी. कानठळ्या बसणारे, आवाज होणारे फटाके फोडू नयेत.

आवाजाचे बंधन तोडल्यास...

एखाद्या ठिकाणी डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास त्याविरोधात स्थानिक पोलिस ठाणे व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई केली जाते. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होते. त्यासाठी नियमाच्या अधीन राहून सण-साजरे करून प्रदूषण टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (latest marathi news)

...तर दंडात्मक कारवाई

दिवाळीत फटाके विक्रीसाठी परवाना आवश्यक आहे. विनापरवाना फटाका विक्री केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. कर्कश आवाज करणारी फटाके विक्री करू नये. विनापरवानगी फटाके विकले जात असल्यास त्याविरोधात कारवाईसुद्धा केली जाते. परवानगी घेणाऱ्यांनाच स्टॉलची जागा उपलब्ध होते.

विक्रेत्यांनी ही काळजी घ्यावी?

मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. ॲटम बॉम्बशिवाय धूर सोडणारे, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना बंदी आहे. शहरात फटाके विक्रीसाठी वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी परवानगी दिली जाते.

आकडे बोलतात...

जळगाव शहरात फटाक्यांचे ठोक विक्रेते : २०

जळगाव शहरात किरकोळ विक्रेते : ५०

प्रत्येक तालुक्यात ठोक विक्रेते : ५ ते ७

प्रत्येक तालुक्यात किरकोळ विक्रेते : २५ ते ३०

"दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडून फटाके विक्रीचे परवाने घेणे सुरू केले आहे. दोन ते तीन दिवसांत दुकाने सुरू होतील. १२५ डेसिबलपेक्षा अधिकचे फटाके विकण्यास मनाई आहे. यंदा फटाक्यांच्या दरात वाढ झालेली नाही."

- युसूफभाई मकरा, कार्याध्यक्ष, जिल्हा फटाका विक्रेता असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT