Yuva Sena chief Aditya Thackeray speaking at a public meeting on Thursday. esakal
जळगाव

Aditya Thackeray Jalgaon Daura : आमचे हिंदुत्व चूल पेटविणारे; भाजपचे घर पेटविणारे : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray Jalgaon Visit : शिवसेनेचे हिंदुत्व हे चूल पेटविणारे आहे तर भाजपचे हिंदुत्व हे घर पेटविणारे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Aditya Thackeray Jalgaon Daura : शिवसेनेचे हिंदुत्व हे चूल पेटविणारे आहे तर भाजपचे हिंदुत्व हे घर पेटविणारे आहे. महिला खासदारांना शिव्या देणाऱ्या मंत्र्याला प्रमोशन दिले जाते तर महिलांवर अत्याचार करणाऱ्याला मंत्रिमंडळात घेतले जाते, असा घणाघात करीत जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल.

असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. ते येथील शेतकरी सहकारी संघाच्या आवारात आयोजित जनसंवाद सभेत बोलत होते. (Aditya Thackeray Jalgaon Visit)

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, की केंद्र सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अतिरेक्यासारखी वागणूक दिली जात आहे. शेतकरी न्यायासाठी आंदोलन करीत आहे. पण त्यांच्यावर ‘ड्रोन’च्या माध्यमातून अश्रुधुराच्या नळकांड्या टाकल्या जात आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली होती. मात्र सध्याच्या मिंधे सरकारच्या कार्यकाळात शेतकरी देशोधडीला लागला आहे.

या वेळी व्यासपीठावर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, नेत्या वैशाली सूर्यवंशी, जिल्हा सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख हर्षल माने, विष्णू भंगाळे, दीपक राजपूत, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, बाजार समितीचे संचालक उद्धव मराठे.

माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, डॉ. अस्मिता पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, पाढंरदचे मच्छिंद्र पाटील, निभोंऱ्याचे गोरख पाटील, रतन परदेशी, योजना पाटील, गजानन मालपुरे, मनोहर चौधरी, जे. के. पाटील, शंकर मारवाडी आदी उपस्थित होते. नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

तात्यांचे विकासाचे ‘व्हीजन’ पूर्ण करू

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून आमदार किशोर पाटील यांच्यावर तोफ डागली. त्या म्हणाल्या, की पाचोरा शहरात नागरिकांना १५ ते २० दिवसांआड पाणी मिळत आहे.

एमआयडीसीचे काय झाले? सूतगिरणी कुठे गेली? माझ्याकडे कुठलीही सत्ता नसताना लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करते आहे. आतापर्यंत दोन हजारापेक्षा अधिक लोकांचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून आणली.

माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांचे लोकसभेचे नव्हे तर विकासाचे म्हणजेच तरुणांना रोजगार, चांगले आरोग्य, शैक्षणिक सुविधा, स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे व्हीजन डोळ्यांसमोर ठेवून काम करीत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT