Jalgaon News : नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी बुधवारी (ता. २६) मतदान होत आहे. येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र उभारण्यात आले असून, मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्यात ८०० शिक्षक मतदार असून त्यातील ७९४ मतदार हयात आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत त्यांना मतदान करता येणार आहे. (Teacher Constituency Election)
तालुक्यात मतदान केंद्राचे एकमेव बूथ यावल तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात उभारण्यात आले आहे. केंद्रप्रमुख म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक म्हणून निवासी नायब तहसीलदार संतोष विनंतेे.
निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी, सुयोग पाटील, सचिन जगताप हे कामकाज पाहणार आहेत. तहसील कार्यालयात मतदार शिक्षकांसाठी यादी पाहणे, वोटर चिठ्ठी आदीसाठी निवडणूक शाखेत मदत केंद्र उभारले आहे. (latest marathi news)
तर मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तालुक्यात एकूण ८०० शिक्षक मतदारांची नोंदणी आहे.
दरम्यान, छानणीत हयात ७९४ मतदार आढळले आहे. यात पुरुष ५९५ तर १९९ स्त्री मतदार आहेत. एका बूथमध्ये एक मतपेेटी असून, एकाच वेळी दोन मतदारांना मतदान करता येईल, अशी सुविधा केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.