Shirur Lok Sabha Constituency of Pune District Adv. Rohini Khadse who came to campaign for Dr. Amol Kolhe. esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : शिरूरच्या मैदानात प्रचारासाठी उतरली ‘मुक्ताईची लेक’; ॲड. रोहिणी खडसेंचा शिक्रापूरला सभांचा धडाका

Jalgaon: शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात होत असलेल्या सामन्यात मुक्ताईच्या लेकीने डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ खानदेशातील रहिवास भागात प्रचाराची धुरा हाती घेतलीय.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात होत असलेल्या सामन्यात मुक्ताईच्या लेकीने डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ खानदेशातील रहिवास भागात प्रचाराची धुरा हाती घेतलीय. ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी...(Jalgaon Adv. Rohini Khadse)

ॲड. खडसे यांनी शिरूर मतदारसंघात शिक्रापूर येथे डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ धडाकेबाज बॅटिंग सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशासमोर महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनल्याचा घणाघात ॲड. रोहिणी खडसे यांनी केला.

एकीकडे त्यांचे वडील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपत परतत असताना कन्या रोहिणी यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार तर केलाच, शिवाय आपल्या पदाला न्याय देत पक्षाच्या उमेदवारांसाठी त्या राज्यभर दौरे करीत आहेत. (Latest Marathi News)

शिक्रापूर येथे कॉर्नर सभा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे खानदेश-विदर्भातून शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थायिक झालेल्या नागरिकांची कॉर्नर सभा आणि भेटीगाठी घेऊन डॉ. कोल्हे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, की यंदाची लोकसभेची निवडणूक निर्णायक असून, देशाची दिशा ठरवणारी आहे. सत्ताधाऱ्यांच्या परवानगीने आणि सहकार्याने महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरात व इतरत्र राज्यात पळवून नेले जात आहेत.

त्यामुळे इथल्या स्थानिक युवकांचा रोजगार हिरावला गेला आहे. मोठे उद्योग बाहेरील राज्यात गेल्याने मोठ्या उद्योगांशी निगडित छोटे उद्योग करणारे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत, अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन त्या करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT