Online Shopping Fraud : सध्याच्या झटपट जमान्यात ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन साहित्य खरेदी करताना सतर्कता बाळगणेही आवश्यक आहे; अन्यथा फसवणूक होऊ शकते. जिल्ह्यात अशा काही घटना समोर आल्या आहेत. फसवणूक टाळण्यासाठी आलेले पार्सल उघडताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतले पाहिजे, असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या विविध वेबसाइट ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. (Record video before open online parcel )
या वेबसाइट ई-कॉमर्सच्या नियमानुसार सुरू झाल्या आहेत. मोबाईलमधील विविध ॲप ऑनलाइन खरेदीचे दालन ग्राहकांपुढे ते उभे करीत आहेत. मात्र, खरेदी करताना ग्राहक म्हणून आपण अधिक सजग राहणे आवश्यक आहे. मागविलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडिओ काढणे गरजेचे आहे.
पार्सल उघडताना त्यात असलेल्या वस्तूंची फूटतूट झालेल्या (डॅमेज) असतील, तर ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होऊ शकते. ऑनलाइन शॉपिंगचे पार्सल मागविताना शक्यतो ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडावा. त्यामुळे खरेदी करताना काही चूक झाल्यास आपण दिलेल्या रकमेचा घोळ होत नाही. (latest marathi news)
फसवणूक झाल्यास करा तक्रार
ऑनलाइन खरेदी करताना आपण कोणत्या वेबसाइटवरून खरेदी करीत आहेत, याबाबत सतर्कता बाळगा. ज्या कंपनीची वस्तू आपण खरेदी करणार आहोत, त्या कंपनीच्या ऑनलाइन खरेदीसंदर्भातील माहिती जाणून घ्या. ऑनलाइन खरेदी करताना काही समस्या आल्यास त्यांच्या निवारणासाठी काही यंत्रणा आहे का?, याची खात्री ग्राहकांनी करून घेणे अत्यावश्यक आहे. फसवणूक झाल्यास याविषयी नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी.
''ऑनलाइन खरेदी व्यवहारात काही महिन्यांपूर्वी मी एका वेबसाइटवरून बाराशे रुपयांत तीन शर्ट मागविले होते. मात्र, मला जे पार्सल आले. त्यात फाटलेल्या अवस्थेतील, जुने वापरलेले शर्ट निघाले होते. तेथे रिटर्नचे ऑप्शन नसल्याने माझी फसवणूक झाली. याशिवाय असे इतरही वेगवेगळे प्रकार घडले आहेत. मात्र, याविषयी सहसा कोणी तक्रार करीत नाही.''-गणेश पाटील, जळगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.