pink bollworm esakal
जळगाव

Jalgaon News : गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी कामगंध सापळे लावा; कृषी विभागाचा सल्ला

Jalgaon : शेतकऱ्यांना योग्यवेळी कापसावर पडणारी बोंडअळीचा प्रतिबंधासाठी कपाशीच्या शेतात अंतराअंतराने कामगंध सापळे लावा.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी कापसावर पडणारी बोंडअळीचा प्रतिबंधासाठी कपाशीच्या शेतात अंतराअंतराने कामगंध सापळे लावा. यामुळे बोंडअळीचा प्रसार थांबेल, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी यांनी दिली. (Advice of Agriculture Department to use scent traps for prevention of pink bollworm)

असा ओळखा प्रादुर्भाव

उघडलेल्या बोडावरती डाग हे गुलाबी बोंडअळीचे प्रमुख लक्षण आहे. ही लक्षणे सुरवातीला येणाऱ्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि पिकाच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत नुकसान झाल्यावर दिसून येतात. कामगंध सापळ्यामध्ये ‘नर पतंग’ अडकल्यास कामगंध सापळ्याद्वारे मादी पतंगासारखा गंध सोडल्यामुळे, नर पतंग आकर्षित होतात. हे कृत्रिमरित्या बनविलेल्या सापळे गुलाबी बोंडअळीची पाहणी आणि प्रादुर्भाव ओळखण्यासाठी वापरतात.

डोम कळी : फुले पूर्णपणे उमलत नाहीत, ते मुरडले जातात. हिरव्या बोंडावर दिसणारे डाग गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावाचे लक्षण आहे. अंदाजे १.५ ते २ मिलिमीटर व्यासाचे लहान निकास छिद्र बोंडावर असल्यास गुलाबी बोंडअळी असल्याचे कळते. त्याचे व्यवस्थापन असे करा. (latest marathi news)

कामगंध सापळे : ऑगस्टच्या मध्यापासूनच गुलाबी बोंडअळीच्या पाहणीसाठी कामगंध सापळे प्रतिहेक्टर लावावेत. कामगंध सापळ्यात कमीत कमी २४ पतंग प्रतिसापळा तीन रात्रीत अडकसल्यास किंवा १० हिरव्या बोंडाचे नुकसान (आर्थिक नुकसानीच्या पातळी) झाले असेल, तर उपलब्ध असल्यास ट्रायकोग्रामा बॅक्टेरी किंवा ब्रॅकॉन परजीवीचा शेतात वापर करावा अथवा कीटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून खाली दिल्याप्रमाणे करावा. बागायती कापसामध्ये प्रत्येक झाडाला ८-१० हिरवी बोंडे असतील, तरच फवारणी करावी. कापसाची वेचणी पूर्ण झाल्यानंतरच हिरव्या बोंडाच्या संरक्षणासाठी फवारणी करावी.

सामूहिक पतंग पकडणे : कामगंध सापळ्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात सामूहिक नर पतंग पकडल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होईल. प्रकाश सापळे शेतात, वखारभोवती, जिनिंग मिल्स, मार्केट यार्डभोवती हंगामात लावल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होईल.

सप्टेंबर महिन्यात कीटकनाशक क्वीनॉलफॉस २० टक्के एएफ किंवा थयोडीकार्ब ७५ टक्के डब्लूपी मात्रा प्रति १० लिटर पाणी, २० मिलि २० ग्रॅमची फवारणी करावी. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये क्लोरपायरिफॉस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्लूपी २५ मिलि २० ग्रॅाम, डिसेंबरमध्ये फेनव्हरेट २० टक्के ईसी किंवा सायपरमेथ्रीन १० टक्के, १० मिली पावर स्प्रेसाठी कीटकनाशकाची तिप्पट मात्रा घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT